दिनांक ३० जुलै,काष्टी/श्रीगोंदा:
एस.एस.सी. परीक्षा मार्च २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत जनता कन्या विद्यालय, काष्टी विद्यालयाचा निकाल ९७.९१ % लागला असून,या परीक्षेमध्ये ९६ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. पैकी ९४ विद्यार्थिनी पास झाल्या त्यापैकी ५६ विद्यार्थिनीं विशेष प्राविण्य प्राप्त केले. १७ विद्यार्थिनींनी ९०%पेक्षा जास्त गुण संपादन केले.
विद्यालयामध्ये कु. दांगट सृष्टी मनोहर या विद्यार्थिनीने ९५.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर कु. कळसकर साक्षी संजय हिने ९४.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला कु. दांगट उज्वला अशोक हिने ९४.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्कूल कमिटी, शिक्षक-पालक संघ, माता पालक संघाचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. चावरे मॅडम, पर्यवेक्षक श्री. पवार रवींद्र सर सर्व शिक्षक व पंचक्रोशीतील पालक यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
(सौजन्य:प्रशांत चव्हाण, सर)
(सौजन्य- प्रशांत चव्हाण सर)
