दिनांक ३० जुलै, श्रीगोंदा:
एस. एस. सी. परीक्षा मार्च २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, या परीक्षांमध्ये २११ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. पैकी ५१ मुलींनी ९० % पेक्षा जास्त मार्क मिळून यश संपादन केले.
विद्यालयामध्ये समृद्धी विजय खर्चे व शुभदा वामन खाडे यांनी ९८.४० % गुण मिळून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. गौरी संजय दळवी ९७.२०% व आकांक्षा मारुती वागस्कर ९६.८० % यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
आमदार बबनरावजी पाचपुते, बाबासाहेब भोस (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य) माजी आमदार राहुल दादा जगताप, (जनरल बॉडी सदस्य) कुंडलिकराव दरेकर, (जनरल बॉडी सदस्य), तुकाराम कन्हेरकर (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य), तुकाराम दरेकर पोपटराव खेतमाळीस, (रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय अधिकारी), (स्कूल कमिटी सदस्य), जयश्रीताई दरेकर, ज्योत्स्नाताई भंडारी, रत्नप्रभा बोरुडे, सुनिता खेतमाळीस, योगिता देशमुख, जयश्री औटी, (मुख्याध्यापिका) वंदना नगरे, (उप. मुख्याध्यापिका) गीता चौधरी, (पर्यवेक्षक) दिलीप भुजबळ, खेडकर आर. डी., दरेकर व्ही. एच. सर्व शिक्षक व पंचक्रोशीतील पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
स्रोत:(श्रीमंत राजमाता विजयराजे शिंदे,विद्यालयाने प्रसिद्धीस दिलेली माहीती)
