दिनांक ३० जुलै, काष्टी/श्रीगोंदा:
दुध दरवाढी संदर्भात दिनांक २० जुलै २० रोजी विक्रमसिंह पाचपुते तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तहसिल कार्यालयाबरोबर जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले होते. आज दिनांक ३० जुलै रोजी बबनराव पाचपुते यांच्या निवास्थानी अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी सह कोरोना प्रादुर्भाव संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी दिनांक १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रास्तारोको संदर्भातील चर्चा करून, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यात आले. तालुक्यातील भाजपा पदाधिकारी दिनांक १ ऑगस्ट २० रोजी श्रीगोंदा येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. तत्कालीन भाजपा सरकारकडून तीन वेळेस दरवाढ करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांना रुपये ३४ ते ३५ पर्यंत दर मिळाला होता. आज दुधाला फक्त १८ ते २० रुपये प्रतिलिटर दर दिला जात असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. म्हणून, सरकारने तातडीने किमान प्रतिलिटर १० रूपये अनुदान द्यावे. तसेच, दुध पावडरला रुपये ५० अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना किमान रुपये ३० प्रतिलिटर दर मिळावा. अशी मागणी आंदोलकांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आयोजित पत्रकार परिषदेमध्ये १ ऑगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाच्या अनुषंगाने शासनाने शेतकऱ्यांना खते व बीयांणे त्वरीत उपलब्ध करून द्यावीत, शेतकऱ्यांचा सातबारा त्वरीत कोरा करावा, शेतकऱ्यांची वीज बिले माफ करावेत, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम त्वरीत देण्याची व्यवस्था करावी. असा आग्रह आंदोलनाच्या निमित्ताने करणार असल्याचे उपस्थित माध्यम प्रतिनिधींना सांगण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येत्या चार ते पाच दिवसांत सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा येथे बैठक आयोजित करणार असून, या बैठकीमध्ये कोरोनाचा आढावा घेत संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत चर्चा करणार असल्याबाबत पाचपुते यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न विधान सभेत मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. याबाबतीत जिल्हाधिकारी अहमदनगर यांनाही पत्र दिले असून, स्कायमेट या वेदर फोरकास्ट करणाऱ्या मशीनच्या संदर्भात माहिती देणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. उपनगराध्यक्ष पदा संदर्भात राजकीय विरोधक हस्तक्षेप करत असल्याने श्रीगोंदा उपनगराध्यक्ष पदाचे नियोजनास विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. (आमदार) बबनराव पाचपुते ,(युवा नेते) विक्रमसिंह पाचपुते सह भाजप पदाधिकारी यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
(स्त्रोत:बबनराव पाचपुते यांच्या निवासस्थानी झालेली पत्रकार परिषद)
