शरीरावर छत्रपती शिवरायांची हुबेहुब प्रतिमा असलेला दुर्मिळ अश्व..

दिनांक ३० जानेवारी,अहमदनगर:
नगर जिल्ह्यातील नेवासा येथील शिव-शंभुभक्त श्री.नानासाहेब शेंडे यांच्या घरी पाळलेल्या (घोडा) अश्वाच्या पाठीवर जन्मजात अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे प्रमाणे दिसणारी हुबेहुब “शिवप्रतिमा” उमटल्याने संबंधित अश्व फक्त मालकासाठीच नाही तर समस्त शिव-शंभुभक्तांसाठी श्रद्धेसह अस्मितेचा आणि आकर्षणाचा विषय झाल्याने सध्यातरी विश्वातील सर्वात नशीबवान, रुबाबदार व देखणा अश्व (घोडा) म्हणून ओळखला जाऊ लागल्याने या अश्वाकड़े सर्वत्र कुतुहालाने पाहिले जात आहे.
नेवासा येथील रहिवाशी असलेले नानासाहेब शेंडे हे एक युवा सामाजिक कार्यकर्ते असून ते शंभुसेना संघटनेचेे नेवासा तालुका संपर्क प्रमुख या पदावर ही कार्यरत आहेत त्याच बरोबर प्रगतशील शेतकरी आहेत. शिवाय त्यांना पशुपालनाची आवड़ असल्याने त्यातूनच शेंडे यांना अश्व पालनाची आवड लागली, काही वर्षापूर्वी त्यांनी आपल्या घरी एक अश्व-मादी आणली अनं त्या मादी-अश्वाच्या वेतातून एक नर-अश्व जन्माला आले होते. त्यांनी त्याचे पालनपोषण सुरु केले, लहानपणीच त्या अश्वाच्या पाठ-पोट-मांडीच्या भागावर अर्थात शरीरावर “शिवप्रतिमा” सदृश प्रतिमा असल्याचे जाणु लागले अनं अश्व जसा-जसा मोठा होऊ लागला तसा-तसा अश्वाच्या शरीरावरील “शिवप्रतिमा” ही खुपच उठावदार आणि स्पष्ठ दिसू लागल्याने मालक ही आश्चर्यचकित झाले. नंतर त्या अश्वाला ते घोड़ा न म्हणता “राजे” या नावाने संबोधु लागले.
तेव्हा पासूनच हा “शिवअश्व” उर्फ़ “राजे” हा अ.नगर जिल्ह्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात..देशात..काय तर विश्वातील सर्वात नशीबवान,रुबाबदार व देखणा अश्व (घोडा) म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याची अप्रतिम कीर्ति सर्वदूर पसरु लागल्याने नंतर तर या अश्वाला व मालकांनाही ठिकठिकाणी आदराने बोलावु लागले, त्यातच छत्रपती शंभुराजांच्या पंचस्थळातील ऐतिहासिक महत्व असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील,पेडगाव येथील किल्ले धर्मवीरगडावरील (बहादुरगड) शंभुराजांच्या “शौर्यस्थळावर” “धर्मवीर दिनाचे” औचित्य साधत राजांचे दर्शन घेण्यासाठी प्रतिवर्षी आणला जाऊ लागला, त्याप्रसंगी सर्व शिव-शंभुभक्तही नशीबवान अश्वाचे मनोभावे दर्शन घेऊ लागले.आता तर अनेक शिव-शंभुभक्त दोन्ही छत्रपतींच्या जयंती, पुण्यतिथि निमित्त तसेच विविध कृषिप्रदर्शन व पशुप्रदर्शन मेळाव्यात अश्वाचे मालक म्हणजेच शंभुसेना संघटनेचेे नेवासा तालुका संपर्क प्रमुख मा.नानासाहेब शेंडे यांना शिवअश्वा सह उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित केले जात आहे.
एकदा तर राजधानी सातारा येथे छत्रपती उदयनराजे यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य कृषिप्रदर्शन व पशुप्रदर्शन आयोजित केले होते तेव्हा तर या “शिवअश्वास” आवर्जून निमंत्रित केले होते आणि त्याप्रसंगी छत्रपती उदयनराजे व त्यांच्या (मातोश्रींनी ) आईसाहेबांनी अश्वाचे मनोभावे दर्शन घेत, श्री.शेंडे यांचा सत्कारही केला होता, अशी माहिती इतिहास अभ्यासक व शंभुसेना संघटनेचे मार्गदर्शक मा.श्री.लक्ष्मीकांत शिर्के यांनी आमच्या वृत्त प्रतिनिधिस दिली. तसेच अन्य कुणालाही “शिवअश्व” प्रत्यक्ष पहावयाचा असल्यास अथवा कार्यक्रमास निमंत्रित करायचा झाल्यास शिव-शंभुभक्तांनी नक्कीच खालील मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन ही शंभुसेनेचे मार्गदर्शक मा. लक्ष्मीकांत राजेशिर्के यांनी केले आहे.
संपर्क – मा.नानासाहेब छबुराव शेंडे मोबाईल न.- 9922708351 नेवासा तालुका संपर्क प्रमुख, शंभुसेना सामाजिक संघटना, तालुका- नेवासा, जिल्हा- अ.नगर

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading