कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांच्या वतीने व माजी मंत्री,आमदार श्री.बबनराव(दादा)पाचपुते यांच्या संकल्पनेतून,श्रीगोंदा शहरात दिनांक १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२० दरम्यान शहरातील महात्मा फुले उद्याना समोरील पटांगणामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दिनांक ३० जानेवारी रोजी माऊली या पाचपुतेंच्या संपर्क कार्यालयावर पत्रकार परिषद घेण्यात आली.त्यात शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन,आमदार बबनराव पाचपुते यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केले आहे.या प्रदर्शनामध्ये दोनशे पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात येणार असून,वाबळेज इव्हेंट्स हे या प्रदर्शनाचे मॅनेजमेंट करणार आहे.दिनांक १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२० दरम्यान चालणाऱ्या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.तसेच,सदर प्रदर्शनांमध्ये व्यवसायिकांनी आपली उपकरणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हावे. अशी माहिती पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगितले आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये संदीप नागवडे,वैभव पाचपुते,सतीशशेठ पोखरणा,(उपनगराध्यक्ष)अशोक खेंडके हे उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग,सहकार व पणन विभाग तसेच हवामाना नुसार शेतीचे मार्गदर्शन व नवनवीन कृषी अवजारे,हार्वेस्टिंग यंत्रे,जैविक कीटकनाशके,डेरी व्यवस्थापना विषयी माहिती, चर्चासत्रे,कृषी मार्गदर्शन पुस्तके,ठिबक सिंचन, शेततळे विषयी मार्गदर्शन,नवनवीन कंपन्यांच्या बियाण्यांची माहिती,सोलर उपकरणे,घरगुती वस्तू, बचत गटांचे स्टॉल्स तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल अशा अनेक उपकरणांची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
वारंवार पडणारा दुष्काळ,अवकाळी पाऊस, वातावरणामध्ये होणारे बदल यामुळे शेती व्यवसाय अत्यंत धोक्यात आला आहे.तशेच स्पर्धेच्या युगामध्ये शेतीव्यवसाय हा आधुनिक पद्धतीने केला.तरच,शेती टिकेल.या सर्व दृष्टचक्रामधून आपला शेतकरी वाचला पाहिजे.त्याला आधुनिक शेती विषयी माहिती मिळाली पाहिजे.या उद्देशाने माजी मंत्री आमदार श्री. बबनराव पाचपुते यांच्या संकल्पनेतून या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे वाबळेज इव्हेंट्स यांनी माध्यमांना सांगितले आहे.