“नामचंद पवळा राष्ट्रीय स्मारक” निधीसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार:रामदास आठवले..

दिनांक १ फेब्रुवारी संगमनेर:
केंद्रीय सामाजिक न्याय(राज्यमंत्री)नामदार रामदास आठवले यांच्या संगमनेर दौऱ्या दरम्यान हिवरगाव पावसा येथे आठवले यांचे स्वागत कला सम्राज्ञी पवळा कला मंच यांच्यावतीने करून,सचिव प्रा. नितीनचंद्र भालेराव यांनी आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी मंजूर कामी आठवले यांना निवेदन सादर केले आहे.
रामदास आठवले यांचे स्वागत करून त्यांना आद्य नृत्यांगना नामचंद पवळा भलेराव यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्मारक त्यांच्या मूळ जन्मगावी बांधण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निवेदन दिले.याप्रसंगी रामदास आठवले साहेब यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून नामचंद पवळा भालेराव यांच्या राष्ट्रीय स्मारक निधी मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.तसेच १५० व्या जयंतीनिमित्त भव्य स्वरूपाच्या राज्यस्तरीय कला महोत्सवाचे आयोजन करण्याची सूचना केली आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले व मा.श्रीकांत भालेराव (प्रदेश उपाध्यक्ष)यांचे स्वागत करण्यासाठी प्रा.नितीनचंद्र भालेराव यांच्या समवेत यादवराव पावशे(संपादक साप्ताहिक कृषी साधना),भास्कर पावशे(ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)जयराम गायकवाड,बाळासाहेब भालेराव,अभिजीत भालेराव,रंजना भालेराव,रोहिणी भालेराव,मयुर भालेराव सह हिवरगाव पावसा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading