महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश.
व्हायरल न्यूज:
दिनांक ३ फेब्रुवारी,मुंबई :
महाराष्ट्रातील शहरांची स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उल्लेखनीय कामगिरी दिसून आली आहे. टॉप १० स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये राज्यातील चार शहरांचा समावेश आहे. राज्यातील स्वच्छ शहर म्हणून नाशिकने पहिला क्रमांक तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. २०२० च्या पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड सहाव्या, नवी मुंबई आठव्या तर वसई-विरार १०व्या स्थानावर आहेत. सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून देशात इंदूरने पहिला क्रमांक पटकावला आहे.
पुन्हा एकदा स्वच्छता सर्वेक्षणमध्ये मध्य प्रदेशमधील इंदूरने अव्वल क्रमांक मिळवला आहे. स्वच्छता सर्वेक्षणच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत १० लाख लोकसंख्या असलेल्या इंदूरने पहिला क्रमांक मिळवला आहे.