श्रीगोंदा नगर पालिकेमार्फत चालू रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा..
दिनांक ३ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात गेली दोन वर्षे झाले नगरोत्थान योजनेतून ३३ कोटी खर्चून रस्त्यांचे कामकाज चालु आहे.या कामात अनेक वेळा अडथळा नैसर्गिक व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम बंद पडले.प्रदिर्घ विश्रांती नंतर रस्त्याच्या कामाला वेग आला.पण डब्लु.बी.एम.च्या कामावर मुरूमा ऐवजी चक्क माती टाकली जात आहे.
या कामावर नगर पालिकेचा स्थापत्य अभियंता यांनी लक्ष देयाला पाहिजे.पण हे महाशय येथे फिरकतही नाही.तसेच या कामावर’मानव सेवा कन्सल्टंट धुळे’ यांचे कन्सल्टंट म्हणुन नियुक्ती केली.या बदल्यात त्यांना कोट्यावधी रुपये देण्यात आले आहेत.तरी पण हे मानव सेवा कन्सलटंट वाले इंजिनीअर रस्त्याच्या कामावर लक्ष देत नाही.ठेकेदार निकृष्ठ काम करत आसतानाही हे ठेकेदारास काही अटकाव करत नाहीत.
नगर पालिकेला कित्येक दिवसांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी साहेब नाहीत.विरोधक सत्ताधारऱ्यां बरोबर हात मिळवणी करत आहेत.शहरातील कामे दर्जेदार होत नसतील.तर, शहरातील चालु असलेले कामे ताबडतोब बंद करा. नाहीतर आम्ही नागरिक जन आंदोलन करू असे प्रहारचे शहरध्यक्ष नितीन रोही यांनी माध्यमांना प्रसिद्धीस दिले आहे.
“मानव सेवा कन्सल्टंट धुळे”या संस्थेची नेमणूक नक्की रस्ते दर्जेदार व्हावे म्हणुन केली.की? रस्ते निकृष्ठ करावे म्हणून केली.याचा खुलासा नगर पालिकेने करून संबधीत संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी !अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.
नगराध्यक्ष सौ.शुभांगी पोटे आणि नगरसेवकांचे शहरात लक्ष वेधले जात नाहीत.त्यांना फक्त सत्ता लागती म्हणून तर त्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉग्रेस मध्ये प्रवेश केला.निवडून आल्या नंतर आताच विधानसभा निवडणुकी दरम्यान कॉग्रेस चे नेते राजेंद्र नागवडे यांच्या सोबत भाजप मध्ये प्रवेश केला.म्हणून,शहराचा विकास होत नाही.आणि निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना विकासाचा वेग दाखवून आणि भूलथापा मारून निवडून येतात.असा आरोप बांधकाम कामगार नेते आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते बंडू कुदळे यांनी केला आहे.