“राजमाता जिजाऊ” व “शिवपत्नी सईबाई” यांच्या चरित्र ग्रंथाचे श्रीमंत रामराजेंच्या हस्ते प्रकाशन..

दिनांक ९ फेब्रुवारी,फलटण:
नुकतेच राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत फलटण शहरात डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर लिखीत ” राजमाता जिजाऊ साहेब ” व ” शिवपत्नी महाराणी सईबाई ” यांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथाचे प्रकाशन विधान परिषदेचे सभापती, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
वंदनीय राजमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले व छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ व महाराणी सईबाई यांचे माहेर असलेल्या नाईक निंबाळकरांच्या ऐतिहासिक फलटण नगरी मध्ये दोन्ही चरित्र ग्रंथांचा प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा झाला असून, या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण संस्थानचे अधिपती व विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत जितेंद्रसिंह गायकवाड हिम्मत बहाद्दर (बडोदा) , श्रीमंत चंद्रसेन दाभाडे (सरसेनापती), श्रीमंत दादाराजे नाईक निंबाळकर (निपाणी),श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (फलटण), श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत प्रियाराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संयुक्ताराजे तसेच नाईक निंबाळकर कुटुंबीय व प्रतिष्ठित मान्यवरांसह शिव-शंभुभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच काही करणास्तव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.शरद पवार यांना प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहता आले नसल्याने प्रकाशित झालेल्या दोन्ही पुस्तकांच्या प्रती शरद पवार यांनी आवर्जून मागवुन घेतल्याचे लेखिका डॉ.सुवर्णा निंबाळकर यांनी बोलताना सांगितले.
त्याच बरोबर आमच्या स्नेही, जेष्ठ मार्गदर्शिका व पुस्तक लेखिका डॉ.सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याबाबत आम्हाला आग्रहाचे निमंत्रण दिले असताना देखील काही कारणास्तव उपस्थित राहता आले नसल्याची खंत बोलुन दाखवत नवनिर्मित पुस्तक आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यास शंभुसेना संघटना व समस्त राजेशिर्के परिवाराच्या वतीने लेखक सुवर्णाताईंना किल्ले बहादुरगडावरुन फोन करुन शंभुमय भगव्या शुभेच्छा दिल्याची माहिती शंभुसेना संघटनेचे मार्गदर्शक मा.लक्ष्मीकांत शिर्के यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली. तसेच समस्त शिव – शंभुभक्तांनी संबंधित प्रेरणादायी पुस्तके मागवुन आवर्जून वाचावीत असे आवाहन शिर्के यांनी केले आहे.
वाचकांना वरील पुस्तकांसह अन्य ऐतिहासिक वाचनीय ग्रंथ हवे असल्यास लेखिका – डॉ.सौ.सुवर्णा नाईक निंबाळकर यांच्याशी थेट संपर्क साधावा मो:- 9404302705

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading