राज्यात शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादीची महाविकास आघाडी!तर,श्रीगोंदयात भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादीची अनोखी आघाडी!..

दिनांक ९ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
राज्यातील राजकारणा विरोधात श्रीगोंदयाचे राजकारण हा पायंडा आजही कायम आहे.राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी एकत्र तर श्रीगोंदयात विरोधात!
राज्यात २०१४ मध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी आघाडी तुटली, श्रीगोंदयात मात्र स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांना जाहीर पाठिंबा देऊन आघाडी कायम ठेवली.१९८० पासून २०१९ पर्यंत श्रीगोंदयाने १९९९,२००९ चा अपवाद वगळता विरोधीपक्षाचा आमदार निवडून दिला.ते वेगळेपण २०१९ मध्ये कायम ठेवले.मग,नेत्यांनी सुद्धा महाविकासचा नियम बदलला.राज्यात शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी एकत्र असताना श्रीगोंदयात काँग्रेस,राष्ट्रवादी,आणि नव्याने भाजपात आलेल्या नेत्यांशी आघाडी झाली आहे.
पंचायत समिती सभापती,उपसभापती निवडीत भाजप खासदार डॉ.सुजय विखे समर्थक काँग्रेस,राष्ट्रवादी आघाडीत सामील झाले.जिल्हा नियोजन मंडळासाठी काँग्रेस,राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोस यांना विजयी करण्यासाठी भाजप,भाजप प्रणीत नगरसेवक पुढे आले होते.तर,काल परवा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला भाजपात गेलेल्या स.म.शि.ना.नागवडे सह.साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पत्नी सौ.अनुराधाताई नागवडे या हजर होत्या.तसेच नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे या देखील भाजपात गेल्या होत्या.त्याही मॅरेथॉन स्पर्धेला हजर होत्या.या मॅरेथॉन स्पर्धेत हजर राहण्यासाठी भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी नेते,कार्यकर्त्यांची मॅरेथॉन हजेरी होती.
ऑगस्ट २०१९ मध्ये बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष झाल्यावर,पक्षातून भाजपात जाणाऱ्यांची मॅरेथॉन स्पर्धा होती.पण आत्ता वाढदिवसाची मॅरेथॉन स्पर्धा समर्थनासाठी होती.सध्या कोण कोणत्या पक्षात आहेत? हे काय कळेनासे झाले आहे.
स.म.शि.ना.नागवडे सह.साखर कारखाना निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांना मदत करण्याचा फतवा भाजप खासदार डॉ.सुजय विखे यांनी काढला भाजप आमदार बबनराव पाचपुते देखील नागवडे बरोबर आहेत.कार? नागवडे यांनी भाजपात प्रवेश केला होता. म्हणजेच भाजपच्या लेखी राजेंद्र नागवडे भाजपात आहेत आणि राजेंद्र नागवडे यांना कारखाना निवडणुकीत भीती नाही.शिवाय,सहकारात पक्षीय राजकारण नसते.त्यामुळे ते भाजपात असले तरी, राजेंद्र नागवडे यांचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात आणि ना.विश्वजित कदम यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध हे संबध महाराष्ट्राला माहिती आहेत.
त्यामुळे भाजप,काँग्रेस,राष्ट्रवादी अशी दुर्मिळ आघाडी हातात हात नव्हे तर वेळेवर हातात कमळ घेऊन, विकासकामे व्हावी म्हणून,तयार झाली आहे.ज्या पक्षाची,ज्या नेत्याची जिथे गरज लागेल,ती घेऊन आपल्या ताब्यातील संस्था टिकविणे हेच या नेत्यांचे धोरण आहे की काय?एकूण काय तर नगराध्यक्षा भाजप समर्थक पण विकास निधी आणण्यासाठी नगरविकास खाते राष्ट्रवादी कडे,शिवाय महसूलमंत्री यांचीही मदत लागते.म्हणून,मॅरेथॉन किंवा इतर कार्यक्रमांना हजेरी दुसरे काय ?
या सर्व घडामोडीत आ.बबनराव पाचपुते मात्र, भाजपशी एकनिष्ठ आहेत.रेल्वे मार्ग सर्व्हे मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,माजी मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले.नूतन जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक घेतली.ते भाजप वाढीसाठी प्रयत्नशील आहेत…
(वार्तांकन:पत्रकार,मुश्ताक पठाण)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading