अतिक्रमण विषयावर बोलणारे,लिहिणारे,छोटे मोठे पुढारी आता मुग गिळुन गप्प का?

img-20200210-wa00079193616840727387707.jpg
चिखली घाटातील नेहमीचेच दृष्य….रस्ता इतका बेक्कार खराब झालाय की सांगायला शब्दच कमी पडत आहेत.
दिनांक १० फेब्रुवारी(घारगाव,श्रीगोंदा):
पहिले काही काळ रस्त्यावर पाणी मारुन पडलेले खड्डे व उंचवटे सारखे करायचे पण सध्या फार दुर्लक्ष झालेले दिसते आहे. मोठी वाहने प्रचंड हेवी मटेरियल घेऊन जात असतात. एक तर वेग धरता येत नाही, चढ व खड्डे यामुळे इंजिनवर दाब येऊन गाडी बंद पडते. यामुळे आर्थिक, शारिरीक व मानसिक ताणाला ड्रायव्हर, ल्किनर व मालकाला बळी पडावे लागत आहे. पारगाव फाट्यावर वळणालगतच काम बंद ठेवले आहे. येथेही वहातुक कोंडी होत असल्याचे समोर येते आहे.
घारगाव येथील गणपती मंदीराजवळच कुकडीच्या पाण्याच्या पुलाचे काम थांबले आहे. येथे मोठा अपघात होण्यासाठीच काम बंद ठेवले काय? चिखली घाटातील महत्वाच्या व अवघड चढणीच्या ठिकाणीच काम बाकी ठेवल्याने दुचाकीस्वार, लहान मोठे वाहन चालक यांना जीव मुठीत धरून घाट पार करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस चोरांची भिती मनात धरून वाहन चालक लवकर घाट संपविण्याच्या भावनेतून वेग वाढवुन चालत असताना मध्येच खड्डे व धोकादायक रस्ता यामुळे पडत आहेत. मध्यंतरी दुचाकीस्वार हा आपल्या कुटुंबाला‌ नगरला घेऊन जात असताना खड्यात आदळुन लहान मुलगा खाली पडला. त्याला डोक्याला, नाकाला तोंडाला प्रचंड दुखापत झाली होती. शिवाय मदततीला कोणीही थांबत नसल्याचे चित्र समोर येत आहे. तरी या कामावरील ठेकेदाराने व संबंधीत खात्याने याकडे लागलीच लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
रस्ता सुरु झाला त्यावेळी, वृक्ष तोड, कच्चा मुरुम, कच्ची खडी, रस्त्याच्या कडेची घरांचे अतिक्रमण याविषयावर बोलणारे, लिहिणारे व छोटे मोठे पुढारी आता का मुग गिळुन गप्प आहेत? असा सवाल दक्ष नागरिक फाऊंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading