रयतच्या लाईफ वर्कर पदी : शहाजी मखरे.

दिनांक १० फेब्रुवारी,श्रीगोंदा:
आशिया खंडात नावलौकिक असणाऱ्या रयत शिक्षण संस्था ,सातारा च्या लाईफ वर्कर पदी प्रा.शहाजी मखरे यांची निवड करण्यात आली.मखरे यांनी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदे येथे १२ वर्ष सेवा केली .या काळात त्यांनी राष्ट्रींय सेवा योजना , मधून शैक्षणिक,सामाजिक व अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम केले.रयत शिक्षण संस्थेच्या कमवा व शिका , योजनेचा विद्यार्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून दिले.
अशा अनेक उल्लेखनीय कामांची दखल घेवून,रयत शिक्षण संस्थेने त्यांना “दि रयत सेवक को ऑप बॅंक लि. सातारा व्हॉईस चेअरमन” म्हणून काम करण्याची संधी दिली.मिळेल त्या संधी सोने करत मखरे यांनी आपल्या कामाचा ठसा उमठविला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे (चेअरमन)डॉ.अनिल पाटील,(सचिव)भाऊसाहेब कराळे,(मैनेजिंग कौन्सील सदस्य)बबनराव पाचपुते,मिनाताई जगधने,राजेंद्र (तात्या)फाळके,(विभागीय अध्यक्ष)दादाभाऊ कळमकर,(माजी आमदार)राहुल (दादा) जगताप , बाबासाहेब भोस,(विभागीय अधिकारी)संजय नागपुरे,कुंडलीक दरेकर,(प्राचार्य)अजित अभंग,प्रा. तुकाराम दरेकर प्रा.ज्ञानदेव म्हस्के यांसह सर्व रयत सेवकां कडून मखरे सरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading