श्रीगोंद्यातील पेडगावात दोन बिबट्या आल्याची अफवा..

दिनांक १० फेब्रुवारी,(पेडगाव श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगांव परिसरात दोन बिबट्या आले असल्याची चर्चा गेल्या सहा दिवसांन पासुन संपुर्ण परिसरात पसरली होती.यातून सबंध पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यावर, श्रीगोंदा येथील वन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी पेडगांव परिसरात सलग चार दिवस पहाणी करुन, बिबट्याचा माग काढत पायाचे ठसे पाहाण्याचा प्रयत्न केला.मात्र,बिबट्याचे पायाचे ठसे आढळुन आलेले नाहीत.
परिसरात पाहाणी करतांना वन अधिकारी घालमे साहेब,संभाजी शिंदे,डपडे साहेब,मुराद तांबोळी, व त्यांचे सर्व कर्मचारी तसेच युवा कार्यकर्ते ईरफान पिरजादे,(पत्रकार)शफीक हवलदार,उपस्थित होते. वन विभागाच्या वतेने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की,कोणीही अफवांना बळी पडू नये.लोकांनी घाबरुन न जाता सतर्क व सावधान राहावे.कुणालाही बिबट्या दिसुन आला.तर,वन विभाग श्रीगोंदा यांना सपर्क करावा.
(वार्तांकन व छायाचित्रे:शफीक हवलदार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading