कोळगावात ५ जणांना कोरोनाची लागण.२ पुरुष व ३ महिलांचा समावेश, एकूण रुग्ण संख्या ७..

दिनांक ५ जुलै,कोळगाव/श्रीगोंदा :

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी आणखी ५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.येथील एकूण रुग्ण संख्या ७ झाल्याने कोळगाव परिसरात तसेच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

chandan ghodke848510538770414127..jpg

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील पांढरेवाडी येथील ५५ वर्षीय वृध्द महिला कोरोना पोजिटिव्ह निघाली असताना दिनांक ३ जुलै रोजी आणखी एक ४५ वर्षीय तरुणाला कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर त्याच्या संपर्कातील एकूण १९ जणांना क्वारंटाईन करून त्यांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यांचा तपासणी अहवाल रात्री उशिरा आल्यानंतर १९ पैकी ५ जणांची कोरोना टेस्ट पोजिटिव्ह आली आहे.त्या ५ पैकी २ पुरुष तर ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली आहे.

कोळगाव येथे एकूण ७ कोरोना रुग्ण झाल्याने कोळगाव परिसरात तसेच तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत ? याचा आरोग्य विभाग शोध घेत आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता घेणे गरजेचे आहे.असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी नितीन खामकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलतांना केले आहे.

स्रोत:(योगेश चंदन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार)..

Leave a Reply