काष्टी बैल बाजार प्रकरणी जयहिंद ची मंत्रालयाकडे धाव …
काष्टी ,श्रीगोंदा दिनांक ३० ऑक्टोबर :
काष्टी ग्रामपंचायत हद्दीमध्ये भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात ग्रामपंचायत च्या माध्यमातून गोळा करण्यात येणारी वसुली नियमबाह्य आहे.ती गोळा करण्यात येऊ नये. या प्रकरणी जयहिंद आणि काष्टी ग्रामपंचायत यामध्ये अनेक वर्षांपासून कागदोपत्री ग्रामपंचायत अधिनियमाच्या आधारे जयहिंद चा वाद चालू आहे . सहकार खात्याने ही पठाणी वसुली नियमबाह्य आहे. असे ग्रामपंचायत अधिनियमाचे पुरावे देऊन सुद्धा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत च्या संगनमताने बंद केलेली नाही, याऊलट जिल्हा परिषदच्या उप अधिकारी श्री शिर्के साहेब यांनी तर अधिनियम जुगारून, ती बंद करू नये. असे आदेश ग्रामपंचायत ला दिले आहेत. या संदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी श्री विश्वजित माने यांच्या सदर विषय निदर्शनास आणून देखील ही वसूलि बंद झालेली नाही. म्हणून स्थानिक नेत्यांचे आणि जिल्हा परिषद च्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंधामुळे चालू नियमबाह्य वसुली चालू आहे. अशी तक्रार ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडे दिलेल्या निवेदनात जयहिंद चे अध्यक्ष श्री विक्रम संभाजीराव पाचपुते यांनी केली आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी की, काष्टीतील जनावरांचा बाजार हा महाराष्ट्रातील मोठा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे.आणि या बाजारामध्ये कर वसुली करण्याचा किंवा जनावारांच्या खरेदि विक्री वर होणाऱ्या नोंदणी फी घेण्याचा अधिकार हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे. ग्रामपंचायत अधीनियमात जर कोणताही बाजार ग्रामपंचायत च्या मालकी हक्काच्या जागेत असेल, तरच वसूल करण्याचा अधिकार ग्रामपंचायत चा आहे .असा स्पष्ट उल्लेख नियम १४१ च्या तरतुदी मध्ये केला आहे . या बाजारामध्ये ग्रामपंचायत चा कोणताही संबंध नाही. तरीही काष्टी ग्रामपंचायत नियमबाह्य वसुली च्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी भरणाऱ्या बाजारातून लाखो रुपयांची वसुली गोळा करत आहे. सदर वसुली पूर्णपणे नियमबाहय आहे.
असे अनेकवेळा प्रशानाच्या तसेच संबंधित खात्याच्या निदर्शनास आणून देखील, जिल्हा परिषद चे ग्रामपंचायत विभागाचे श्री शिर्के फक्त दुर्लक्षच करत नाही तर त्यांनी तर सदर वसुली करण्याचे चक्क आदेश ग्रामपंचायत ला दिले आहेत . त्यामुळे प्रत्येक शनिवारी ग्रामपंचायत जवळ जवळ २ ते ३ लाख रक्कम गोळा करते. कधी कधी शेतकऱ्यांना सदर फी द्यायला सुट्टे पैसे नसतील तर, त्यांना जणांवरासहित ग्रामपंचायत ठेकेदारा मार्फत जनावरे ३ते ४ तास आत सोडले जात नाही, किंवा कधी कधी प्रवेशही दिला जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे अनेक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली जाते . ती फक्त श्री शिर्के यांनि ग्रामपंचायत ला दिलेल्या चुकीच्या मार्गदर्शनामुळेच. म्हणून, पंचक्रोशीतील शेतकरी या बाजाराकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत .ग्रामपंचायत चा या वसुलीशी काही समबंध नसतांना, अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना छळले जाते . या विरोधात जयहिंद ग्रुप काष्टी ने वेळोवेळी ग्रामसभेच्या माध्यमातून आवाज उठवला. परंतु ,जिल्हा परिषद अधिकारी श्री शिर्के यांच्या या चुकीच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यां वर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. अशी तक्रार निवेदनातून जयहिंद चे अध्यक्ष श्री विक्रम संभाजीराव पाचपुते यांनी मंत्रालया कडे केली आहे. तसेच,सदर नियमबाह्य वसुली असल्याचे वारंवार निदर्शनास आणून देवुन सुद्धा, जनावरांच्या बाजारातील वसुली बंद करणार नाही .तुम्ही कोर्टातून बंद करा. असा दम श्री शिर्के देतात .यावरून ग्रामपंचायत चे आर्थिक हित संबंध असल्याचे निदर्शनास येते असे.ही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर वसुली बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषद ला द्यावेत.अशी मागणी या निवेदनावर मंत्रालयकडे केली आहे .यावर ग्रामविकास विभाग कोणता निर्णय घेणार याची वाट पहावी लागणार आहे.
प्रतिक्रिया : – सदर म्हणणे मंत्रालय मध्ये नियमात सर्व पुराव्यानिशी मांडले आहे. जिल्हापरिषद च्या श्री शिर्के आणि काष्टी ग्रामपंचायत यांचे आर्थिक हित संबध असावेत असा विश्वास पाचपुते यांनी व्यक्त केला थोडा वेळ वाट पाहणार आहे मंत्रालयातून काय निर्णय होतोय जर ही नियमबाह्य पठाणी वसुली बंद नाही झाली तर जिल्हाधिकारी समोर उपोषण करणार असल्याचे सांगितले.

