श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर …

श्रीगोंदा दिनांक ३१ ऑक्टोबर :२०१९ च्या जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग रचना आणि आरक्षण आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे.यात नऊ प्रभाग व १९ पोट प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत. या १९ पोट प्रभागांच्या आरक्षणाची सोडत श्रीगोंदा-पारनेरचे प्रांताधिकारी गोविंदा दाणेज साहेबांनी काढली. 

दत्तवाडी प्रभागात एक (अ) हा पोट प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी व  एक (ब) हा सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव आहे. लक्ष्मीनगर प्रभागात २ (अ) सर्वसाधारण महिलेसाठी आणि २ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव आहे. औटेवाडी प्रभागात ३ (अ) अनुसूचित जाती व्यक्तीसाठी तर ३ (ब) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. शेख महंमद महाराज प्रभागात ४ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला ) साठी आणि ४ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव आहे. 

 

गणेशनगर प्रभागात ५(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आणि ५ (ब) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. सावित्रीबाई फुले भाजी मंडई प्रभागात ६ (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि ६ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे. सिद्धार्थ-ससाणेनगर प्रभागात ७ ( अ) अनुसूचित जाती महिलेसाठी आणि ७ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे. भैरवनाथ मंदिर प्रभागात ८(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आणि ८ (ब) सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव झाला आहे.

 

साळवण देवी प्रभागात ९(अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी , ९(ब) सर्वसाधारण महिलेसाठी आणि ९ (क) सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. एकूण नऊ प्रभागात पहिल्या आठ प्रभागातून प्रत्येकी दोन आणि नवव्या प्रभागातून तीन असे १९ नगरसेवक निवडले जाणार आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी दादासाहेब औटी, भागचंद घोडके यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले असल्याने येथील राजकीय समीकरण झपाट्याने बदलताना सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत.

Leave a Reply