विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणा-या आरोपीकडुन ७,७५,४६०/- रुपयांचा मुददेमाल जप्त.. श्रीगोंदा पोलीसांची कारवाई..

दिनांक १५ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:

अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक  राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे, व उप विभागीय पोलीस अधिकारी, विवेकानंद वाखारे उप विभाग व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  किरण शिंदे यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर एक सुझुकी कंपनीची कॅरी गाडीत एक अनोळखी इसम हा देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करत आहे,

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पो.नि किरण शिंदे , यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोना/गोकुळ इंगावले, पोकॉ/संदिप राऊत, पोकॉ/संदिप शिरसाठ व पोकॉ/आनंद मैड यांना सदरची बातमी सांगून कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितल्याने..

लागलीच पोना/गोकुळ इंगावले यांनी दोन खाजगी पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावून सदरची माहिती सांगून कारवाई करणेकामी सोबत येण्यास कळविल्याने खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर हॉटेल यशोदा समोरील रोडवर सापळा रचुन विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारुची विक्री करणारा इसम नामे शैलेंद्र सुखदेव बोरगे वय-५२ वर्षे रा. सोनेवाडी ता.जि. अहिल्यानगर यास सुझुकी कंपनीची कॅरी गाडीसह ताब्यात घेण्यात आले.

त्याचेकडून ५ लक्ष/-रुपये किमंतीची सुझुकी कंपनीची कॅरी व २,७५,४६०/-रुपये किमंतीची देशी-विदेशी दारु असा एकुण ७,७५,४६०/-रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर बाबत पोकॉ संदिप शिरसाठ यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीगोंदा पो.स्टे मध्ये मु.दारुबंदी का.क.६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना गोकुळ इंगावले हे करीत आहे.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading