श्रीगोंदयाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची पारनेर पोलीस स्टेशनला बदली.श्रीरामपुर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची श्रीगोंदयाच्या नवीन पोलीस निरीक्षक पदी नेमणूक…..
श्रीगोंदा दिनांक १७ नोव्हेंबर :
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गेल्या दीड वर्ष्यापूर्वी पोलीस निरीक्षक पदी नेमणूक झालेले बाजीराव पोवार यांची आज रोजी पारनेर च्या निरीक्षक पदी नेमणूक झाल्याचे प्रशासकीय पत्रा द्वारे समजले आहे .त्यांच्या कार्यकाळात पोवार यांनी श्रीगोंदयात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. आणि त्यात ते बहुतांशी यशस्वी ठरले.मात्र,काही विषयात त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याच्या घटना घडल्याचे काहींचे म्हणणे होते .
त्यानुसार त्यांनी पोवार यांच्या बदलीचे चक्रे फिरवल्याने त्यांची बदली झाल्याचे सोसियल माध्यमातून समोर आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार कविता डाडर मृत्यू प्रकरण व काष्टी गावातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी काही संबंधितांनी पाठपुरावा करून साहेबांची बदलीची कार्यवाही केल्याचे चर्चेतून समोर आले आहे.त्याचबरोबर शारदा काळे या आदिवासी महिलेच्या नग्न मारहाण प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने थेट मंत्रालयात आवाज उठऊन साहेबांच्या बदलीची प्रक्रिया केल्याचे काहींच्या चर्चेतून समोर आले.शिवाय सचिन गायकवाड प्रकरणी पोवार यांच्या कारवाई वर नाराज झालेल्या काही दिग्गज नेत्यांनी पोवार यांच्या विरोधात कारवाई करीत मंत्रालयातून सूत्र हलवल्याने पोवार यांची बदली झाली असल्याचे बोलले जात आहे.मात्र,यांतील खरी वस्तुस्थिती काय आहे ?हे मात्र समजू शकलेले नाही.
त्याचबरोबर काही लोकांच्या चर्चेतून पोवार साहेबांची भूमिका ही सर्वसमावेशक असल्याचे बोलले जात आहे.सामान्य माणसाने सन्मानाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जाऊन आपली फियाद नमूद करावी,त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे स्थानिक प्रशासनाचे दडपन नव्हते.सर्व पोलीस ठाणे स्वच्छ व सुंदर करण्यात पोवार यांचा मोलाचा वाटा होता.श्रीगोंदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोवार आणि त्यांच्या प्रशासनाला यश मिळाल्याने आय.एस.ओ. मार्फत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मानांकन प्राप्त झाले.पोवार यांच्या प्रयत्नातून काही दिसांपूर्वी भंगाराच्या स्वरूपात असलेले श्रीगोंदा पोलीस ठाणे ही एक बाग झाली. त्याठिकाणी लोक झाडाच्या सावलीत ठेवलेल्या बाकांवर बसू लागले.अंधारात असलेले पोलीस ठाणे सर्वत्र हायमॅक्स दिवे लावल्याने उजळून गेले.श्रीगोंदा पोलीस ठाणे हे भंगाराच्या दुकानातून एका प्रसन्न ठिकाणात परावर्तित करण्यातही पोवार यांचा सिंहाचा वाटा आहे.नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी घरात दिवाळी करण्याऐवजी स्नेहालयात उपेक्षित ,गरीब, मागावर्गीय,आदिवासी बांधवांच्या मुलांच्यात जाऊन दिवाळी साजरी केल्याने त्यांचे विविध स्थरांतून कौतुक करण्यात आले.आदिवासी समाजाची मुलं शिक्षणाच्या प्रवाहत यावीत म्हणून,त्यांनी तीन चार वेळा प्रशिक्षण शिबीर घेतली .
पारधी समाजाच्या मुलांना शाळेत घाला म्हणून त्यांच्या वस्तीत जाऊन त्यांचे प्रबोधन केले व शिक्षणाचे महत्व समजवण्याचा प्रयत्न केला.शाळा ,महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून,त्यांच्या अडचणी जाणून घेत,मजनुगिरी व टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंचा चांगलाच बंदोबस्त केला.सामान्य माणसाला माणूसपणाने वागवणे, विद्यार्थ्यांना पुस्तकांची व वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सुद्धा, पोवार यांनी शर्तीचे प्रयत्न केल्याचे,श्रीगोंदा पंचक्रोशीत बोलले जात आहे.सामाजिक सलोखा टिकावण्यासाठी शांतता कमिटी मार्फत विविध संघटनांच्या बैठका घेऊन त्यांना कायदा संमजविला जात असे.त्यांतून शहरात व तालुक्यात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाल्याची श्रीगोंदाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्याविषयी सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे.शिवाय आगामी निवडणुका लक्षात घेऊन पोवार साहेबांसारखा खमक्या व कायद्याचा धाक निर्माण करणारा अधिकारी काही कालखंड राहणे गरजेचे असल्याचेही सर्वत्र बोलले जात आहे.
कायदा जाणकारांच्या माहिती नुसार जिल्ह्यात चार ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून,ही प्रशासकीय प्रक्रिया आहे.यात कोनाच्या हस्तक्षेपामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याचेही अनेकांचे म्हणणे समोर येत आहे.काहींच्या म्हणण्या नुसार पारनेर सारख्या ठिकाणी पोवार यांच्या सारखा खमक्या अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याने त्यांना तेथे नेमण्यात आले असावे अशीही चर्चा ऐकण्यात येत आहे.
जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या…
पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांची पारनेर वरून राहुरी पोलीस ठाण्यात बदली,पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची दंगल विरोधी पथक अहमदनगर येथून श्रीरामपुर पोलीस ठाणे येथे बदली,पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची श्रीगोंदा येथून पारनेर येथे बदली.पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची श्रीरामपुर येथून श्रीगोंदा येथे बदली झाली आहे.
