भारिप’ महापालिका निवडणूक लढविणार : अशोक सोनवणे
नगर : प्रतिनिधी भारिप बहुजन महासंघाच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी बारा बलुतेदारांचे नेते अशोक सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी ही निवड केली. दरम्यान, महापालिकेच्या निवडणूकीत सर्व जागा भारिप बहुजन महासंघ व एमआयएम एकत्र लढविणार असल्याची घोषणा सोनवणे यांनी केली.
भारिप बहुजन महासंघाच्या महासचिवपदी दिलीप साळवे, संघटक म्हणून नितीन घोड़के, उपाध्यक्षपदी राजेंद्र काळे, विनोद गायकवाड यांची, तर सहसचिवपदी प्रकाश भोसले यांची निवड करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाच्या शहर युवा अध्यक्षपदी योगेश साठे, महासचिवपदी सुरेश कोंडलकर, संघटक म्हणून अॅड. अतुल सरोदे यांची, तर सहसचिवपदी रंजन साळवी यांची नियुक्ती करण्यात आली. भारिप बहुजन महासंघाची शहर कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी बाबासाहेब घुले, महासचिवपदी सुनील शिंदे, सहसचिवपदी अड. भानुदास होले यांची तर संघटकपदी प्रा. विठ्ठल वाघमोडे यांची निवड करण्यात आली.पत्रकार परिषदेत सोनवणे यांनी माहिती दिली. सोनवणे म्हणाले की, महापालिकेच्या जागा भारिप बहुजन महासंघ, एमआयएम,ओबीसी सेवा संघ, बारा बलुतेदार महासंघ, वंचित मराठा, बहुजन क्रांती पक्ष तसेच इतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

