कारखान्याची बदनामी करुन शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालविण्याचा हा धंदा बंद करावा …व्हा.चेअरमन विश्वासराव थोरात …
श्रीगोंदा,दिनांक १५ नोव्हेंबर
स्वर्गिय कुंडलिकराव तात्या जगताप यांनी संघर्षातून उभ्या केलेल्या कुकडी सहकारी साखर कारखान्याला बदनाम करण्याचे षडयंत्र कुणाच्या तरी इशाऱ्यावरुन सुरु आहे. कारखान्याच्या साखर ठेवलेल्या गोडावूनला सील केल्याच्या कपोकल्पीत बातम्या पसरविल्या जात आहेत. ज्यांच्या इशाऱ्यावरुन हे सुरु आहे त्यांनी जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज ठेवायला पाहिजे. जो कारखाना सक्षमपणे सुरु आहे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतो त्याच कारखान्याची बदनामी करुन शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालविण्याचा हा धंदा बंद करावा. कारखान्याचे साखर गोडावून सील केलेले नाही कुठलाही पुरावा नाही, माहिती नाही आणि सोशल मिडीयावरुन बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे. ज्यांनी हे प्रसिध्द केले आहे त्यांच्याविरोधात कायदेशिर कारवाई कारखाना करणार आहे.अर्धवट माहिती घेवून कुकडी व कार्यसम्राट आमदार राहूलदादा कुंडलिकराव जगताप पाटील यांच्या विरोधातील ही बदनामीची मोहिम हाती घेणाऱ्यांच्या घरात आणि पुण्यात काय सुरु आहे याचा पर्दाफाश करु. कुकडीरुपी सुर्य झाकण्यासाठी असे कितीही हात आले तरी कुकडी हा शेतकऱ्यांचा कारखाना असून कुणाची खाजगी मालमत्ता नाही. अशी माहिती कारखान्याचे मा. व्हा.चेअरमन विश्वासराव थोरात यांनी दिली. कुकडी सह. साखर कारखाना हा नेहमी शेतकरी, सभासद व ऊस उत्पादक यांचे हित लक्षात घेवून निर्णय घेतो. कारखाना चांगल्या पद्धतीने चालतो.कारखान्याचे संस्थापक कर्मयोगीस्व. कुंडलिकराव (तात्या) जगताप पा. यांनी अथक परिश्रमातुन शेतकऱ्यांसाठी उभी केलेली ही सहकारी संस्था आहे. स्व.तात्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुस्थितित चालू होता. मात्र काही लोकांना या संस्थेचे हित पाहवत नाही. त्यामुळे राजकीय आकासापोटी सर्वसामान्य ऊस उत्पादक व सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करुन कारखान्याची बदनामी करण्याचा हेतू आहे. सर्व सहकारी साखर कारखान्यांना जिल्हा बॅंक व इतर बॅंका साखर मालतारणावर कर्जपुरवठा करत असतात. कुकडी सह. साखर कारखान्यास उभारणीपासुन अ. नगर जिल्हा मध्य. सह. बॅंकेने कर्जपुरवठा केला आहे. कारखान्याचे कुठल्याही प्रकारे गोडावून सील केलेले नाही. त्यामुळे जाणीवपुर्वक पसरवलेल्या या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये असे जाहिर आवाहन कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन विश्वासराव थोरात यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे मा. व्हा.चेअरमन सुखदेवराव तिखोले, जेष्ठ मार्गदर्शक व मा.संचालक नारायण पाटील जगताप, संचालक विवेक पाटील पवार आदि उपस्थित होते
