कुकडीच्या आवर्तनात १ टी.एम.सी.पाण्याची वाढ..माजी मंत्री पाचपुते यांची माहिती.सर्व शेतकऱ्यांचे भरणे होणार ….
श्रीगोंदा दिनांक १२ नोव्हेंबर : श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या कुकडीच्या पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली असून, यासाठी आज कुकडीचे मुख्य अभियंता राजपूत, अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ यांची भेट घेऊन १ टी.एम.सी.पाणी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. आज भाजप चे पदाधिकारी दिनकर पंधरकर ,नगराध्यक्ष मनोहर पोटे ,नगरसेवक सुनील वाळके ,सतीश मखरे , शहाजी खेतमाळीस ,भाऊसाहेब खेतमाळीस ,बबनराव आनंदकर,बाळू खेतमाळीस ,,गौतम खेतमाळीस ,संदीप सातव ,शहाजी मखरे ,बंडू पंधरकर ,साहेबराव मोटे ,श्रीरंग धुमाळ ,पोपट बनसोडे ,विवेक पंधरकर,निंबवी चे पोपट शिर्के ,कोरेंगव्हाण चे रामदास इधाटे,आदी कार्यकर्त्यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ यांची भेट घेतली. याबाबत, अधिक माहिती अशी कि , श्रीगोंदा तालुक्यात सध्या पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे, आज कुकडीचे मुख्य अभियंता राजपूत, अधीक्षक अभियंता हनुमंत धुमाळ यांची भेट घेतली व तालुक्यातील फळबागा व इतर पिकांसाठी कुकडीचे आवर्तन सोडण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या आवर्तनात सर्व शेतकऱ्यांचे भरणे काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यामुळेच चालू आवर्तनात १ टी.एम.सी.पाणी वाढवून घेतले आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचे भरणे राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे . विसापूर च्या लिफ्टधारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे ,१५ दिवस अगोदर पाणी सुटल्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ,१३२ लिंक कॅनॉल सह लाभक्षेत्रातील सर्व वितरिकांना पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे त्यामुळे सर्व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली .
अधिकाऱ्यांचे आभार *** कुकडीचे अधिकारी आवर्तनाबाबत आपल्याला मदत करत आहेत आज आपण तालुक्यातील पदाधिकरी व कार्यकर्ते यांच्या समवेत कुकडीच्या मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन चालू आवर्तनात १ टी.एम.सी.पाणी वाढवले आहे. त्यामुळे, कुकडीच्या अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली .

