पैश्याच्या व्यवहारातुन ४१ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या.आरोपी विरोधात एट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल…

तांदळी दुमाला ,श्रीगोंदा ,दिनांक २२ नोव्हेंबर: 

श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथील रहिवाशी तान्हाजी भुजंग शिंदे या ४१ वर्षीय इसमाने डोकेवस्ती , आढळगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी आढळगाव चे पोलीस पाटील पोपटराव छत्तीसे यांनी मयत तान्हाजी यांचा बंधू मनोहर भुजंग शिंदे,यांना फोन करुन सदरील माहिती दिली . मनोहर शिंदे यांनी नातेवाईकांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली .घटनास्थळी पोलिसांनी सदरील प्रेत दादा बाप्पू शिंदे ,तात्याराम शिंदे ,सोमा शिंदे  पोलीस पाटील पोपटराव छत्तीसे इत्यादींच्या मदतीने खाली घेतले.त्यावेळी मयताच्या प्यांटीच्या खिश्यात एक लिहलेली चिठ्ठी सापडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.चिठ्ठीत मयत तान्हाजी यांनी लिहले आहे की,विजय टांगळ ने माझा घात केला आहे.त्याने मला दोन लाख रुपये मागितले होते.नाही देत म्हणून त्याने मला हाणले आहे.माझेच त्याच्याकडे एक लाख रुपये आहेत. मी दुसऱ्या कडून काढून दिलेले आहेत.माझ्या घरच्यांना माझे सांगणे आहे की,मी मेल्यानंतर त्याला सुट्टी देऊ नका.फाशी घेण्याचे एवढेच कारण आहे.या फिर्यादीवरून विजय टांगळ याच्यावर गु.र.न.आय ६१७/२०१८ भां.द.वि.३०६ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)आर व ३(१)५ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून, गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply