श्रीगोंदा तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी रास्ता रोको आंदोलन …..
श्रीगोंदा दिनांक १९ नोव्हेंबर:
श्रीगोंदा तालुक्याला हक्काचे पाणि मिळावे श्रीगोंदा येथे रस्ता रोको अंदोलन तब्बल २ तास कुकडी लाभार्थी शेतकर्यानी रस्ता आडवुन तीव्र स्वरुपाचे अंदोलन करण्यात आले .यावेळी न’गर दक्षिण चे खा.दिलीप गांधी यांच्या अश्वासनानंतर सदर रस्ता रोको अंदोलन मागे घेण्यात आले .
कुकडी कालव्याला २५ आॅक्टोबरला पाणि सुटले आसुन अद्याप पर्यंत श्रीगोंदा शहर व तालुक्याला पाणि आले नाही कुकडी प्रशासन पाणि सुटण्याच्या वेगवेगळ्या तारखा देऊन शेतकरी वर्गाची फसवणुक करत आहे याचा निषेदार्थ आज गोरख आळेकर यांच्या नेतृत्वा खाली सर्व पक्षिय रस्ता रोको अंदोलन करण्यात आले यावेळी मा .मंत्री बबनराव पाचपुते,शिवसेनेचे नेते घनःशाम शेलार ,राजु गोरे,नानासाहेब कोथिंबिरे,भाऊसाहेब खेतमाळीस,भिमराव आनंदकर,सुनिल वाळके ,शिवाजी शेळके,राजु जकाते,सलीम जकाते,किरण खेतमाळीस,सचिन खेतमाळीस,नानासाहेब खेतमाळीस,विठ्ठल आनंदकर,ऊमेश बोरुडे,प्रसाद होले,सागर बोरूडे,ऋषिकेश बोरुडे,नितीन आनंदकर,दादासाहेब खेतमाळीस,देवराव वाकडे ,विजय शेंडे,विलास रसाळ,धनंजय कोथिंबिरे,प्रकाश खेतमाळीस इत्यादी हजारो शेतकरी उपस्थित होते.
यावेळी खा. दिलीप गांधी म्हणाले पाणि मुबलक प्रमाणात आसुन एक दिवस एकडे तिकडे होईल पण पाणि शेवटच्या घटका पर्यंत पाणि मिळेल हे सरकार आपणास पाणि देण्यास कटीबध्द आहे.२१ तारखेला १३२ ला पाणि देण्याचे अश्वासन खा.गांधी साहेबानी दिले.यावेळी बबनराव पाचपुते म्हणाले शेतकर्यांचा अंत पाहु नका अन्यथा कुकडीचे पाणि पेटल्याशिवाय राहणार नाही .२१ तारखेला पाणि न सुटल्यास गेट तोड अंदोलन करण्यात येईल.
घनःशाम शेलार म्हणाले कर्जत करमाळ्याला पाणि देण्यास आमचा विरोध नाही पण आम्हालाही तात्काळ पाणि सोडावे आमचा अंत पाहु नका …
