डीजेल टँकरचा दुरुस्ती करतांना स्फोट, एक जण ठार !एक गंभीर जखमी…

देवदैठण, श्रीगोंदा दिनांक २२नोव्हेंबर :

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे रिकाम्या डिझेल टँकरची दुरुस्ती करत असताना, स्फोट होऊन संदीप भालेकर हा तरुण ठार झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संदीप संभाजी भालेकर वय वर्षे ३५ याचे देवदैठण येथे विश्वकर्मा वेल्डींग नामक दुकान आहे. गणेश गायकवाड या इसमाने येथे त्याचा टँकर दुरुस्तीसाठी आणला होता.पूर्वी डिझेल साठी वापरात असणाऱ्या या टँकरचा आत्ता पाणी वाटपासाठी वापर करायचा होता. त्यासाठी आज दुपारी २:१५ वाजनेच्या दरम्यान आत उतरून वेल्डींगच्या साह्याने त्या टँकरचा पत्रा कापायचे काम सुरू होते. पण काही वेळातच टँकरच्या टाकीच्या आत ज्वलनशील गॅस निर्माण होऊन, मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर टँकरच्या टाकीतून संदीप भालेकरला बाहेर काढणे शर्तीचे झाले.काही स्थानिक तरुणांच्या मदतीने व दोन जेसीबीच्या मशीन च्या सह्याने सदरील टँकर तोडून संदीपला टाकीतून बाहेर काढन्यात आले. गंभीर दुखापतीमुळे जखमी अवस्थेत संदीप भालेकरला उपचारासाठी शिरूर येथे हलवण्यात आले,मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. त्याचबरोबर देवदैठण येथील ड्रायव्हर गणेश गायकवाड हाही गंभीररीत्या जखमी झाला असून,त्याच्यावर शिरूर येथील विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक रामेश्वर घुगे, हवालदार रावसाहेब शिंदे व गोरख गायकवाड करत आहेत.

Leave a Reply