शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचा दिवाळी किल्ले बनवा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न..


कोळगाव,श्रीगोंदा दिनांक २७ नोव्हेंबर :-

श्रीगोंदा येथील गडकिल्ले ट्रेकिंग गृप आयोजित दिवाळी  गडकिल्ले  स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ  अतिशय नियोजनबद्ध व उत्कृष्ट झाला.  स्पर्धकांचा  उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील १५ गावातील ११७ मुलांनी सहभाग घेतला.हा सोहळा मुरलीधर अण्णा होणराव माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा येथे हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बंडू मखरे सर हे होते. यावेळी प्रा.योगेश मांडे यांचे भारदस्त आवाजात अंगावर शहारे आणणारे व्याख्यान झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यााामध्ये दौंड तालुका पंचायत समिती अधिकारी मारुती इंगळे, केंद्रप्रमुख दिलीप घोडके,अनिल भदागरे, रामदास मेहेत्रे, मोहन पवार, कोंडीबा झावरे, पत्रकार अमीन शेख, नितीन रोही, योगेश चंदन, लक्ष्मण नाईकवाडी, दत्तात्रय जगताप, अविनाश निंभोरे, सौ.संगिता इंगळे, सौ.गीता वेठेकर, सौ.सीमा साळवे, सौ.कविता खेतमाळीस उपस्थित होते.

       संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर स्पर्धेत सहभागी विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम बक्षिसे वाटप करण्यात आले. ग्रामीण व शहरी विभाग एकत्रित लहान गट.- प्रथम क्रमांक- ओंकार हौसराव चाकणे चांडगाव व धनंजय अविनाश निंभोरे घारगाव विभागून,द्वितीय क्रमांक- स्नेहा निकेश झिटे (पेडगाव रोड, श्रीगोंदा) तृतीय क्रमांक- साईराज जालिंदर डांगे(रविवार पेठ, श्रीगोंदा) ग्राामीण विभाग- प्रथम क्रमांक- ओम कैलास पालकर (जलालपुर) द्वितीय क्रमांक- अक्षदा हरिदास कणसे (पेडगाव),तृतीय क्रमांक- नाथा दत्तात्रय भालेकर (घारगाव), शहरी विभाग प्रथम क्रमांक- संस्कार संतोष भोईटे(शिक्षक कॉलनी),द्वितीय क्रमांक- विजयसिंह देविदास वाळकेे (मखरेवाडी),वरद संतोष पवार (हेलीपॅड), विशेष शिवदुर्ग पुरस्कार- विद्या मारुती इंगळे- साईनगर श्रीगोंदा  (उत्कृष्ट किल्ला),सौ. विद्या हनुमंत पवार-घारगाव- (गृहिणीचा किल्ला),जि. प. शाळा बाबूर्डी ता श्रीगोंदा(विद्यार्थी सहभाग) नवयुग प्राथमिक शाळा दौंड जि पुणे, जि .प. प्राथमिक शाळा पेडगाव नवे, महामानव बाबा आमटे प्रशाला- घुगलवडगाव, जि. प. प्रा.शाळा श्रीगोंदा शुगर ता. श्रीगोंदा. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस किल्ले  बनवले होते.  काहीं  किल्यांनी तर डोळ्यांचे पारणे फेडले,असे परीक्षणाच्या वेळी निदर्शनास आले.

           या स्पर्धेत खूपच चुरस असू शकते हे अधोरेखित झाले.दिवाळी किल्ले बनवा स्पर्धेचा उद्देश केवळ मनोरंजन नसून त्यामागे मुलांच्या प्रयोगशीलतेला , कल्पकतेला  बुद्धीला चालना देणे हा आहेे ,मुले किल्ला बनविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात, अशा मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप  मारण्याचा शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे असे मत संस्थेचे सचिव प्रमोद शिर्के यांनी व्यक्त केले. यावेळी  साईकुमार शिंदे, कपिलेश्वर उल्हारे, संदिप हिरवे, जालिंदर पाडळे, संदिप मांडे,बाळकृष्ण भापकर, संदिप खलाटे, सोमेश शिंदे,जयराम खोसे, राजाराम सातपुते, संतोष पवार, संतोष गोरखे, संजय वेठेकर,दिगंबर भुजबळ, मारुती वागस्कर, रविंद्र होले व शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.(छाया व वार्तांकन -योगेश चंदन )

Leave a Reply