तहसिलदार महेंद्र माळी यांच्या पथकाची भीमा नदीपात्रातील अवैध वाळु उत्खननावर कारवाई…..

श्रीगोंदा, दिनांक ३० नोव्हेंबर :-
आज ३० नोव्हेंबर रोजी , श्रीगोंदयाचे तहसिलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध गौण खनिज उतख्तनन करणाऱ्या वर प्रशासकीय कारवाई करीत ,मौजे गार, कौठा ,निमगाव, परिसरात अवैध वाळु उत्खनन करीत असलेल्या ३ सक्शन बोटी  नष्ट केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सदर कारवाई श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र महाजन (माळी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या कारवाईत पेडगावचे मंडल अधिकारी आजबे,पेडगावचे तलाठी पोटे,आर्वी चे तलाठी यादव, लिपिक श्रीकांत गोरे, तलाठी साबळे, मंडल अधिकारी कळसकर, तलाठी तनपुरे  , पोलिस कॉन्स्टेबल देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड इत्यादीनीं सहभाग घेतला.या कारवाईत एकूण १५ लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याचे प्रसिद्धस दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.
वाळू तस्करी बंद करण्यासाठी नियमितपणे अशीच कारवाई करण्यात आली आहे व यापुढेही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी सर यांनी माध्यमानां दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.     
स्फोटकाच्या सह्ययाने बोटी उडविण्यात आल्या त्याची चित्रफीत 

 

Leave a Reply