घोड नदी पात्रात पोलीस – महसूल ची संयुक्तिक कारवाई….
श्रीगोंदा दिनांक ४ डिसेंबर :-
       श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी पात्रात वांगदरी परिसरात चालू असलेल्या अवैध गौण खनिज उतख्तननांवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
            श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या पथकाने कारवाई करीत, चार जेसीबी व चार टॅक्टर ताब्यात घेतले आहेत. टाकलेल्या या छाप्यात साधारणपने ६० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. आज दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस ही कारवाई करण्यात आली असल्याचे, मिळालेल्या माहितीनुसार समजते आहे.
          अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत कुमार मीना यांना वांगदरी व आसपासच्या परिसरात जोरदार अवैध गौण खनिज उतख्तनन चालू असल्याचे समजले, त्यानुसार त्यांनी आपला मोर्चा या ठिकाणी अचानकपणे वळवला , या बाबत खबऱ्यां नाही खबर न लागल्याने वांगदरी परिसरात घोड नदी पात्रात आयतेच वाळू तस्कर पोलिसांच्या जाळ्यात सापडले .या कारवाईत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. शिंदे ,आसबे, कोपनर ,राऊत, जाधव, बोऱ्हाडे,वाबळे सह महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही भाग घेतला असल्याचे समजते आहे

Leave a Reply