चर्मकार विकास संघाची श्रीगोंदा तालुका कार्यकारिणी जाहीर….
चर्मकार विकास संघाच्या (श्रीगोंदा) तालुका पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम चर्मकार विकास संघाच्या अहमदनगर येथील जिल्हा कार्यालयात नुकताच पार पडला.
यावेळी ,माजी शिक्षण उप संचालक दिलीप गोंविद साहेब व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या उपस्थितीत लोणी व्यंकनाथ येथील संदिप बाळासाहेब साळवे यांची युवा तालुका उपाध्यक्ष पदी तर पिंपळगाव पिसा येथील सचिन विठ्ठल डोईफोडे यांची तालुका युवा संघटक व लोणीव्यंकनाथ येथील निलेश कैलास साळवे यांची युवा कार्यकारणी प्रसिध्दी प्रमुख (श्रीगोंदा) पदी नियुक्ती करण्यात आली आहे .या सर्वांना नियुक्तीपत्र व संत रविदास प्रतिमा देऊन नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी (जिल्हाध्यक्ष) संतोषजी कानडे,(श्रीगोंदा) युवा तालुका अध्यक्ष अतुल साळवे, सोनाजी भोसले सामाजिक कार्यकर्ते आणि सचिन वेठेकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Related