रांजणगावमध्ये १७ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला; श्रीगोंद्यातील एकासह सात जण अटकेत..

दिनांक २७ मार्च २०२५, रांजणगाव/श्रीगोंदा:

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मित्राकडे खुन्नस देऊन पाहिल्याच्या कारणावरून १७ वर्षीय सौरभ राठोडवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत सात आरोपींना अटक केली आहे. यात श्रीगोंद्यातील एका आरोपीचा समावेश आहे.

ही घटना २३ मार्चच्या रात्री घडली. ओंकार देशमुख व रोहन बोटे यांनी सौरभच्या पोटात, डोक्यात आणि पाठीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. इतर आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण केली. फिर्यादीवरून २४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बीडमधील केज येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून त्याला येरवडा येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading