श्रीगोंदयातील एका विरोधात मोक्का…

दिनांक १६ मार्च,श्रीगोंदा:

नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार भालसिंग खून प्रकरणातील संशयित आरोपी विश्‍वजित रमेश कासार याच्यासह नऊ जणांविरूद्ध मोक्का लावण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी दिली.

विश्‍वजित रमेश कासार (वय-२८), इंद्रजित रमेश कासार (वय-२५), मयूर बापूसाहेब नाईक (वय-३०) संकेत भाऊसाहेब भालसिंग (सर्व रा. वाळकी ता. नगर), सुनील फक्कड अडसरे (रा. शेंडाळा ता. आष्टी जि. बीड), शुभम बाळासाहेब लोखंडे (रा. करंडे ता. शिरूर जि. बीड), सचिन भांबरे (रा.खेतमाळवाडी ता.श्रीगोंदा), भरत भिमाजी पवार (वय २६ रा.साकत ता. नगर), संतोष भाऊसाहेब धोत्रे (रा. कारगाव ता. आष्टी जि. बीड) असे मोक्का लावलेल्या आरोपींचे नावे आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यातील विश्‍वजित कासार, इंद्रजित कासार, मयुर नाईक, भरत पवार, संतोष धोत्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपी पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

स्रोत:(गुगल)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading