दिनांक १७ जुलै २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात दोन आरोपींवर भा.द.वि.का. कलम ३७६, ३५४, ५०४, ५०६ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाची माहिती अशी की, दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२:०० वाजता फिर्यादी आणि तिचा मावस भाऊ खेडकर शहरातील एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. त्यावेळी खेडकर याच्या चुकीमुळे फिर्यादीच्या अंगावर भाजी सांडली. त्यानंतर खेडकरने फिर्यादीला लॉजच्या रुममध्ये जाऊन कपडे धुण्याचा सल्ला दिला.
फिर्यादीने कपडे धुत असताना खेडकरने तिचे फोटो आणि व्हिडिओ काढले आणि त्यानंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, त्याने हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गव्हाणेवाडी येथे दोन वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पुढे, ७ जुलै २०२४ रोजी खेडकरचा मित्र अविष्कार नवले याने फिर्यादीला धमकावून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पिडीतेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिनांक १६ जुलै २०२४ रोजी गुन्हा नोंदवला. या प्रकरणात खेडकर आणि नवले या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाची चौकशी सपोनि. अजय गोरड, पोसई समीर अभंग, आणि प्रभारी अधिकारी पो.नि. ज्ञानेश्वर भोसले हे करत आहेत.
स्रोत:(फिर्याद)






