दिनांक १६ जुलै २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील महाराजा कॉलेज समोरील सार्वजनिक ठिकाणी दिनांक १२ जुलै २०२४ रोजी दुपारी १:४५ वाजता काही इसमांमध्ये झालेल्या मारामारीमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. पोलीस ठाण्यात हजर असलेल्या पोलीस पथकाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनेची माहिती मिळताच पोसई समीर अभंग, पोहवा संतोष फलके, पौना गोकुळ इंगवले, पोशि सचिन गोरे, पोशि प्रताप देवकाते आणि पोशि मनोज साखरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक शासकिय वाहनाने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यावर काही इसम आपापसात मारामारी करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु इसमांनी पोलीसांचे काहीएक न ऐकता सार्वजनिक ठिकाणी मारामारी सुरूच ठेवली.
पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करून या इसमांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी आपली नावे साहिल अन्वर शेख, सोहेले अन्दर शेख, सद्याम अन्वर शेख (सर्व रा. श्रीगोंदा शहर) तसेच अशोक भिमा पालवे व राहुल फुलमाळी (दोघे रा. श्रीगोंदा कारखाना) अशी सांगितली. या इसमांना ताब्यात घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामिण रुग्णालय, श्रीगोंदा येथे पाठवण्यात आले.
पोलिसांनी या इसमांशी वारंवार संपर्क साधून, त्यांना झालेल्या मारहाणीबाबत फिर्याद देण्याचे आवाहन केले, परंतु, अद्यापपर्यंत त्यांनी कोणतीही फिर्याद दाखल केलेली नाही. म्हणुन, या घटनेनंतर पोलिसांनी भा.न्या.सं. २०२३ चे कलम १९४ (२) अन्वये या पाच जणांवर कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
स्रोत:(फिर्याद)






