दिनांक २२ जानेवारी २०२४, श्रीगोंदा/सातारा:
सातारा जिल्ह्यातील बावडा येथील २४ वर्षीय तरुणीने शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या वरून श्रीगोंद्यातील २४ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ जून २०२३ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सिंहगड रोड येथील एका लॉजमध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपण लग्न करु असे आमिष तरुणीला दाखवले. त्यानंतर दिनांक २१ जून २०२३ रोजी आरोपी त्याच्या दुचाकीवरून सिंहगड रोड परिसरातील एका लॉजमध्ये तीला घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर वारंवार सात ते आठ वेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तरुणीला लग्न करण्यास नकार दिला.
नमूद प्रकार तिच्या घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन पैशांचीही मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने त्याला पैसे दिले. मात्र, आरोपीकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने तिने आरोपीला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर आरोपीने आपल्या संबंधाची माहिती तुझ्या घरच्यांना सांगतो. तुझ्याशी लग्न देखील करणार नाही..! असे म्हणत शिवीगाळ करुन दमदाटी केल्याचे पिडीतेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गून्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कादबाने करत आहेत.
स्त्रोत:(ऑनलाईन वृत्त)
