दिनांक २२ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथे मुख्यालय असलेल्या श्रीगोंदा तालुका प्राथमिक शिक्षक सह क्रेडिट सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली असून, दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सहकार अधिकारी श्री.निलेश मुंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळ सभेमध्ये या संस्थेच्या व्हा. चेअरमन पदी बेलवंडी बु.” येथील रहिवाशी श्री. संतोष विठ्ठल शिंदे सर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
या संस्थेची स्थापना ८ वर्षां पुर्वी झाली असून, संस्थेकडे आज मितीला सुमारे बारा कोटींच्या ठेवी आहेत. १० कोटी कर्ज वाटप केले आहे. प्रत्येक सभासदांना ८% दराने २१ लाख रुपये कर्ज पगार तारणावर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेकडील एकूण ठेवी पैकी निम्या ठेवी या शिक्षकांव्यतेरिक्त सामान्य नागरिकांच्या असुन, यातील कर्ज थकबाकी प्रमाण ०% आहे. ठेवीदारांना अनेक सुविधा असुन, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामान्य नागरीक व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना केले आहे.
स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)

