मैदाने ही शाळांची समृद्धी आहे – मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर..

दिनांक २३ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
सिद्धार्थनगर व ससाणेनगर परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद प्राथ. शाळा सिद्धार्थनगर येथील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी नगरपरिषद श्रीगोंदा यांनी मैदान उपलब्ध करून दिले. या मैदानाचे उदघाटन नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांचे हस्ते व नगरसेवक संग्राम घोडके, हृदय घोडके, निशुभाई बेपारी, जिवाजी घोडके, नंदकुमार ससाणे यांचे उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष स्थानाहून बोलताना ढोरजकर म्हणाले की, पुस्तकी ज्ञाना बरोबरच मैदानी खेळांना महत्व आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे व संगणकामुळे मुले मैदानावर कमी दिसत आहेत. तेंव्हा या मुलांना मैदाने उपलब्ध करून देणे हा त्यावरील प्रभावी मार्ग आहे असे त्यांनी सांगितले.

उपस्थित विद्यार्थी व पालक..

यावेळी माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके तसेच हृदय घोडके व नंदकुमार ससाणे यांनी या मैदानास संरक्षक भिंतीची मागणी केली असता मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने ती देण्याचे मान्य केले. प्रशस्त मैदान पाहून विद्यार्थी भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम घोडके यांनी केले. सूत्रसंचालन गोरख घोडके यांनी केले. तर, आभार अविनाश घोडके यांनी मानले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप मोटे, रावसाहेब घोडके, भारत घोडके, अशोक घोडके, शिवाजी घोडके सचिन घोडके, भाऊसाहेब घोडके, ज्ञानदेव शिरवाळे, आनंद घोडके, लालासाहेब ससाणे, किशोर नेटके, श्रीकांत घोडके, भीमराव घोडके, नानासाहेब घोडके, शरद घोडके, स्वप्नील घोडके, तुषार घोडके, मीनाताई घोडके,अरविंद पवार, मछिंद्र घोडके, सह शिक्षिका शारदा शेळके, मंगल जाचक, सह शिक्षक संतोष सोनवणे, सागर काराळे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

स्त्रोत:(रामदास ठाकर, सर)

उपस्थित मान्यवर व्यक्ती आणि प्रशासकिय अधिकारी..
Adv..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading