राम घोडके (उपसरपंच) यांची अभ्यास दौऱ्यातून प्रेरणा..

दिनांक २४ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन २०२३-२४ अंतर्गत जिल्हा परिषद, अहमदनगर च्या वतीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये दिनांक १८ ते २१ जानेवारी २०२४ दरम्यान अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यांमध्ये भेटी दिलेल्या ग्रामपंचायतींमध्ये झालेली नाविन्यपूर्ण कामे यांद्वारे प्रेरणा घेऊन खांडगाव वडघूल तालुका श्रीगोंदा येथील उपसरपंच श्री राम घोडके यांनी रत्नागिरी येथे अभ्यास दौऱ्या दरम्यान शाळांमधील शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता व सुशोभीकरण पाहून त्याद्वारे प्रभावित होऊन आपली शाळा देखील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असावी, मुलांना हसत खेळत शिक्षण घेता यावे या दृष्टीने अभ्यास दौऱ्यावरून परतताच कुठलाही वेळ न दवडता लगेचच जिल्हा परिषद वडघुल शाळेच्या सुशोभीकरणास सुरुवात केली आहे.

अभ्यास दौऱ्यात सहभागी पदाधिकारी..

हे खऱ्या अर्थाने अभ्यास दौऱ्याचं यश आहे. असे गौरवद्गार श्री. दत्तात्रय उरमुडे – अभ्यास दौरा प्रमुख तथा जिल्हा प्रशिक्षण समन्वयक (पेसा), ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर यांनी काढले. अशा प्रकारचे अभ्यास दौरे जर निघाले तर, विचारांची आदान प्रदान होऊन व नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून भविष्यात अनेक आदर्श ग्रामपंचायती घडण्यास वेळ लागणार नाही. हे याचे उत्तम उदाहरण असे मत सहाय्यक गटविकास अधिकारी तथा अभ्यास दौरा प्रमुख मधुकर जाधव साहेब यांनी मांडले.

चार दिवसीय अभ्यास दौऱ्यात अनेक ग्रामपंचायतीला भेट देऊन QR code, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, जलजीवन मिशनची कामे, शाळा, आरोग्य केंद्र, स्वच्छता सायन्स इनोव्हेशन सेंटर, गांडूळ खत प्रकल्प, गोबरधन प्रकल्प, आयुर्वेदिक झाडांचा देवराई उपक्रम, बंधारे असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून एक वेगळी दिशा मिळाली आणि त्याचा फायदा नक्किच आपल्या तालुक्यात होईल असे उपसरपंच राम घोडके यांनी सांगितले. तसेच आपल्या तालुक्यात जर ग्रामपंचायत विकसित व्हायच्या असेल तर, महाराष्ट्र राज्य जीवन्नोती आभियान, रोजगार हमी योजना प्रभावी राबविल्या पाहिजे असे मत मांडले.

अभ्यास दौऱ्यात सहभागी पदाधिकारी

मला या अभ्यास दौऱ्यात संधी दिल्याबद्दल पंचायत समिती श्रीगोंदा गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी सारिका हराळ मॅडम यांचे जाहिर आभार व्यक्त करतो. मला असे वाटते जनते बद्दल प्रेम, आपुलकीची भावना, सतत नव नविन कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आणि सामान्य लोकांविषयी आपुलकी आणि सतत गावाला शासनाच्या वतीने काहितरी मिळेल.. यासाठी केलेली धडपड याचे फलित म्हणजे राज्यस्तरीय अभ्यास दौरा निवड आणि हा दौरा नक्कीच जनतेच्या कल्याणासाठी, कल्याणकारी योजना राबविण्यासाठी माझ्या साठी एक नविन ऊर्जा प्रेरणा देणारा राहील.

स्त्रोत:(राम घोडके, उपसरपंच, वलघुड)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading