दिनांक २४ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:
कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना लि. पिंपळगांव पिसा, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर यांनी ऊसतोडणी वहातुकपोटी दिलेल्या अॅडव्हान्स रक्कमेचे थकबाकी रक्कमेचे परतफेडीपोटी आरोपीने दिलेला धनादेश न वठल्याने श्रीगोंदा न्यायालयाने आरोपी बाजीराव कोंडीराम कदम यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रक्कम रुपये ५,५५,१८८/- नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मा. न्यायाधीश एन.एस. काकडे यांचेसमोर सुनावणी झाली. याबाबतची फिर्याद फिर्यादी कारखान्याचे माहितगार इसम प्रमोद विठ्ठल पवार यांनी दिली होती. फिर्यादी कारखान्यातर्फे कार्यकारी संचालक सुनिल यशवंत महिंद व चिफ अकौंटंट अनिल भगत व नारायण सरोदे यांनी केस संदर्भात मार्गदर्शन केले. कारखान्यातर्फे अॅड. पुरुषोत्तम जगन्नाथ फाटे यांनी केसचे कामकाज पाहिले.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्र)
