दिनांक २२ जानेवारी २०२४,श्रीगोंदा:
माजी केंद्रीय मंत्री स्व.बाळासाहेब विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू कट्टर सहकारी व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हॉईस चेअरमन ॲड. सुभाष दादा डांगे गेल्या दीड वर्षभरापासून आजारी आहेत. रविवारी अवघ्या ५ मीनीटाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने श्रीगोंदा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळात वेळ काढून, डांगे यांच्या घरी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.
मध्यंतरी डांगे यांच्या पत्नी सौ.रतन डांगे यांना हृदयविकाराचा त्रास झाला होता व ऑप्रेशनही करावे लागले होते. त्यावेळेही खासदार सुजय दादा व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावेळीही घरी येवुन विचारपूस केलती. अलीकडे तालुक्यातील नेते मंडळी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात तिथे राजकारणाच्या, समजकारणच्या व्यापातही विखे कुटुंब कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवतात याचे हे उदाहरण आहे.
सुभाष डांगे आणि विखे कुटुंबाशी ४८ वर्षा पासून स्नेह आहे. डांगे यांनी विखे गट श्रीगोंद्यातच नव्हे तर, जिल्ह्यात वाढीसाठी समन्वयक म्हणून, भूमिका बजावली.. विखे हाच नेता मानला.. त्यामुळेच विखेंची तिसरी पिढी देखील डांगे यांच्या मदतीला धावत आहे. यापूर्वीहि सुभाष डांगे यांच्यावर पुणे येथे कोरोनात व अपघातानंतर नगर येथे उपचार सुरू असताना खा.डॉ.सुजय विखे यांनी सर्व तोपरी विचारना केली होती.
जिल्ह्यातील कार्यकर्ता त्याची रोजी, रोटी, मार्ग, त्याचा सन्मान, पद याची सर्व माहिती विखे कुटुंबाकडे असल्यानेच उत्तरेतील रहिवाशी असलेले विखे दक्षिणेत निवडणूक लढवतात व जिंकतात देखील.! परंतु, अलीकडे निष्ठा, पद मिळे पर्यंत टिकते.. तिथे डांगे – विखे ऋणानुबंध दुर्मिळ असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरू नये. या भेटी दरम्यान डांगे यांचे पुत्र नगरसभा आंदोलन अध्यक्ष राजेश डांगे, ॲड. सौ.शीतल डांगे व कुटुंबीय तसेच विक्रम पाचपुते उपस्थित होते.
स्त्रोत:(राजेश डांगे, श्रीगोंदा)
