आज मध्यरात्रीपासून १ मे पर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू… काय असणार चालू..? काय बंद राहणार?

दिनांक १८ एप्रिल, श्रीगोंदा/अहमदनगर:

अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. या परस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना व आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील दैनंदिन वाढती रुग्ण संख्या आणि उपलब्ध असलेली बेड संख्या, ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा याची सध्यस्थिती पाहता, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रनेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढत चालला आहे. आवश्यक सेवा आणि सुट असलेल्या प्रवर्गातील बाबींकरिता तसेच नागरिक अनावश्‍यक रित्या बाहेर पडत असल्याची बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आल्याने. त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे कामी प्राप्त अधिकारानुसार अत्यावश्यक सेवा आणि सूट असलेले प्रवर्गातील काही बाबींवर निर्बंध लागू करणे आवश्यक असलेल्या आदेशाचे परिपत्र जाहीर केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा एक भाग म्हणून, नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा, यासाठी डॉ.राजेंद्र भोसले (जिल्हाधिकारी, अहमदनगर) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करीत अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये दिनांक १८ एप्रिल २०२१ रोजीच्या रात्री १२:०० वाजल्यापासून ते दिनांक १ मे २०२१ रोजीच्या सकाळी ७:०० वाजेपर्यंत कलम १४४ अन्वये मनाई, नियंत्रण व विनियमन करण्यात आले आहे.

🔶बंद असलेल्या बाबी:

◾हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिक अप सेवा देण्यास मनाई

असेल. मात्र, ते होम डिलिव्हरी देऊ शकतील.

◾धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील.

◾आठवडे बाजार पुर्णतः बंद राहतील.

◾भाजीपाला, फळे बाजार बंद राहतील फक्त (द्वार वितरणास) मान्यता राहील.

◾दारू दुकान पूर्णतः बंद राहतील.

◾टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरता वाहतुकीस चालू राहतील.

◾चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवां करता वाहतुकीस चालू राहतील.

◾दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवां करता वापरण्यास परवानगी राहील.

◾सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.

◾कटिंग, सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.

◾शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पुर्णतः बंद राहतील.

◾स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.

◾विवाह समारंभास बंदी राहतील.

◾चहाची टपरी, दुकाने पूर्णतः बंद राहतील.

◾अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.

◾सिनेमा हॉल, नाट्यगृह, सभाग्रुह, संग्रहालय पुर्णतः बंद राहतील.

◾सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.

◾सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.

◾सेतु सेवा केंद्र, आधार केंद्र, पूर्णतः बंद राहतील.

◾व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग, इव्हिनिंग वाक पूर्णतः बंद राहील.

◾बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

🔶वेळेच्या निर्बंधानुसार चालू असलेल्या बाबी:

◾किराणा दुकान (सकाळी ७:०० ते ११:००)

◾दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री (सकाळी ७:०० ते ११:००)

◾भाजीपाला विक्री फक्त द्वार वितरण (सकाळी ७:०० ते ११:००)

◾अंडी मटण चिकन मस्त विक्री (सकाळी ७:०० ते ११:००)

◾कृषी संबंधित सर्व सेवा दुकाने (सकाळी ७:०० ते ११:००)

◾पशुखाद्य विक्री (सकाळी ७:०० ते ११:००)

◾पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅस विक्री (सकाळी ७:०० ते ११:००)

◾पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवा माल वाहतुक याकरता डिझेल विक्री (नियमित वेळेनुसार) या निर्बंधानुसार कलम १४४ प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात दिनांक १८ एप्रिलच्या रात्री १२:०० वाजलेपासून १ मे २०२१ च्या सकाळी ७:०० वाजेपर्यंत या प्रकारे निर्बंध लागू करण्यात आले बाबत जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेशाचे जाहीर परिपत्रक काढले आहे.(A curfew will be imposed in the district from midnight today till May 1 … what will continue ..? What will be closed?)

स्त्रोत: (जिल्हाधिकारी अहमदनगर यांचा आदेश दिनांक १७/०४/२०२१)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading