दिनांक ९ सप्टेंबर २०२५ श्रीगोंदा:
पंचायत समिती अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले अभियंता प्रकाश पाचनकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदाराकडून ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचनकर हे सेवेत असताना बांधकाम ठेकेदार पुरी यांच्याकडे मोबाईल फोनवरून लाच मागणी केली होती. ठेकेदाराने ही संभाषणाची ध्वनिमुद्रिका तयार करून ती नाशिक येथील एसीबी कार्यालयात सादर केली. तपासादरम्यान ध्वनिमुद्रिकेतील आवाजाची पडताळणी करण्यात आली असता, तो आवाज पाचनकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वी एसीबीने त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)


Advertise..
