दिनांक १० सप्टेंबर २०२५,श्रीगोंदा:
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल व बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. बाबासाहेब भोस यांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्राचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उप प्राचार्य डॉ. साळवे यांनी केले, आभार प्रदर्शन सचिन झगडे सरांनी मानले तर सूत्रसंचालन संदीप दरेकर सरांनी केले.

या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील तब्बल ६३० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले –
🏐 हॉलीबॉल निकाल
१४ वर्षे मुले:
१. महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल श्रीगोंदा
२. सुनंदाताई होनराव श्रीगोंदा
३. मुरलीधर अण्णा होनराव श्रीगोंदा
१४ वर्षे मुली:
१. कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल श्रीगोंदा
२. शिवाजीराव नागवडे स्कूल श्रीगोंदा
३. मुरलीधर अण्णा होनराव विद्यालय श्रीगोंदा
१७ वर्षे मुले:
१. मुरलीधर अण्णा होनराव विद्यालय श्रीगोंदा
२. महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा
३. शिवाजीराव नागवडे स्कूल श्रीगोंदा
१७ वर्षे मुली:
१. शिवाजीराव नागवडे स्कूल श्रीगोंदा
२. मुरलीधर अण्णा होनराव विद्यालय श्रीगोंदा
३. सैनिक स्कूल देवदैठण
१९ वर्षे मुले:
१. छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा
२. परिक्रमा सायन्स कॉलेज काष्टी
३. महाराजा कॉलेज श्रीगोंदा
१९ वर्षे मुली:
१. छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा
२. महाराजा कॉलेज श्रीगोंदा
३. परिक्रमा सायन्स कॉलेज काष्टी

🏀 बास्केटबॉल निकाल
१४ वर्षे मुले:
१. सीक्रेट हार्ट कोळगाव
२. चिंबळे माध्यमिक विद्यालय चिंबळे
३. इंदिरा गांधी विद्यानिकेतन श्रीगोंदा फॅक्टरी
१४ वर्षे मुली:
१. सीक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल कोळगाव
२. चिंबळे माध्यमिक विद्यालय चिंबळे
३. इंदिरा गांधी विद्यानिकेतन श्रीगोंदा फॅक्टरी
१७ वर्षे मुले:
१. सीक्रेट हार्ट कोळगाव
२. संस्कार पब्लिक स्कूल देवदैठण
३. इंदिरा गांधी विद्यानिकेतन श्रीगोंदा फॅक्टरी
१७ वर्षे मुली:
१. सीक्रेट हार्ट कोळगाव
२. शिवाजीराव नागवडे स्कूल श्रीगोंदा
३. इंदिरा गांधी विद्यानिकेतन श्रीगोंदा फॅक्टरी
१९ वर्षे मुले:
१. महाराजा कॉलेज श्रीगोंदा
२. परिक्रमा संकुल काष्टी
३. छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा
१९ वर्षे मुली:
१. छत्रपती महाविद्यालय श्रीगोंदा
२. परिक्रमा सायन्स कॉलेज काष्टी
३. महाराजा कॉलेज श्रीगोंदा

या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झीटे, तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष जामदार सर, उपाध्यक्ष रोहन रंधवे सर, सचिन झगडे सर, रवी काळाने, महेश गिरमकर, माजी क्रीडा शिक्षक शेलार सर व पत्रकार रणसिंग साहेब उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी तालुका क्रीडा समितीचे सर्व सदस्य, क्रीडा शिक्षक, हॉलीबॉल पंच अक्षय शिंदे, बास्केटबॉल पंच नितीन काशीद व सर्व पंचांचे मोलाचे सहकार्य लाभले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
