दिनांक ४ ऑगस्ट, श्रीगोंदा:
शहरासह तालुक्यात पोलिसांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेल्या गोरख उद्योगांसह प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यास येणाऱ्या सामान्यांपासून सर्वांनाच (अपवाद वगळता) देवाचे करावे लागते.? म्हणजे पोलीस अदखलपात्र गुन्ह्यांपासून दखलपात्र गुन्ह्यांपर्यंत फिर्यादी ऐवजी आरोपींना सहकार्य करण्यास विशेष प्राधान्य देतात. असे प्रकार काही उदाहरणांतून निदर्शनास येत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यात अनधिकृत व्यवसायांसह पोलीस कार्यक्षेत्रात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांना पोलीस प्रशासन वेगवेगळ्या प्रकारे हाताळतांना समोर येत आहे. श्रीगोंदा पो.स्टे.त अदखलपात्र गुन्ह्यांपासून दखलपात्र गुन्ह्यांकडे रकमेचा आलेख वाढत जात आहे. काहीजण तर नुसत्या तक्रार अर्जावरच हजारोंची उलाढाल करतात.

श्रीगोंदा पोलिसांचा कारभार म्हणजे, आरोपींवर कारवाई करायची झाली तरी पैसे, समजपत्र द्यायचं तरी पैसे, आरोपी बोलवायचे पैसे, जेलमध्ये भेटायचे पैसे, दंडाची पावती फाडायची नाही पैसे, मास लावलं नाही पैसे, आपसात तडजोड करायला पैसे, नवरा बायकोचे भांडण पोलिसांत आले पैसे, वाळूचा ट्रक पकडला पैसे, ट्रक सोडायला पैसे, उशिरापर्यंत हॉटेल चालवायला पैसे, वेळेत दुकान बंद केली नाहीत पैसे, अवैध व्यवसायांवर कारवाई केली पैसे, कारवाई नाही करायची पैसे, अवैद्य व्यवसाय चालवायचेत पैसे…!

गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी अटक होईपर्यंत पैसे, अदखलपात्र गुन्हा दाखल झाला तरी पैसे, दखलपात्र गुन्हा दाखल झाला तरी पैसे, असे पैसे पैसे करणाऱ्या खात्याचा एखादा कर्मचारी किंवा अधिकारी पैसा, रक्कम, देवाचं करता करता अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकला नाही. इथपर्यंत देवाचं दैवं बलवत्तर म्हणावं लागेल. मात्र, आत्ता काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संघटना पोलिसांना पैसे द्यायच्या तयारीला लागल्या आहेत.!

श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कायद्याचा धाक दाखवून सामान्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. जर कोण्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने कोणत्याही घटनेत अनधिकृत पैसे मागितले. तर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन वर किंवा ९९३०९९७७०० या व्हाट्सएप क्रमांकावर तक्रार नोंद करा. असे आवाहन काही सक्रिय कार्यकर्त्यांच्या माध्यमांतून करण्यात येत आहे. ACB’s focus on chaotic affairs of Shrigonda police.? Possibility of an employee / officer getting caught in a trap.!
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गैरमार्गाने पैसा उकळणाऱ्या काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हालचालीवर सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष असून, अनागोंदी कारभार करू पाहणारे ACB च्या जाळ्यात अटकतील यात शंका नाही.!
स्रोत:(पीडितांकडून मिळालेली माहिती)
