मागासवर्गीयांच्या विकास कामांवर वेळू ग्रामस्थांचा डोळा.! प्रशासनाच्या मदतीने दलित वस्तीतील डीपी गावात बसवण्याचा घाट..? अधिकाऱ्यांसह काही ग्रामस्थांवर ॲट्रॉसिटीची मागणी.. दिनांक २४ ऑगस्ट रोजी प्राणांतिक उपोषण..

दिनांक ५ ऑगस्ट, श्रीगोंदा:

शासनाच्या निर्देशांनुसार प्रशासनाच्या माध्यमांतून उपेक्षित, वंचित व मागासवर्गीय समाजाच्या सबलीकरणासाठी विविध योजना राबवल्या जातात. विकास निधीतून दलितवस्ती सुधार योजनेत रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा प्राधान्याने पुरवत दुर्बल समाजाला प्रवाहात आणण्यासाठी शासन वेगवेगळे नियोजन करत असते. मात्र, मंजूर झालेले विकास कामं मागासवर्गीय वस्त्यांमध्ये न करता.! त्या आम्हांलाच पाहिजेत म्हणतं काही जातीवादी लोक मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीला विरोध करू पाहत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सदरील विकास कामं सर्वसाधारण ठिकाणी किंवा गरज नसलेल्या ठिकाणी जाणीवपूर्वक दडपशाहीचा वापर करून पार पाडतात.

या स्वस्वार्थी भूमिकेमुळे श्रीगोंदा तालुक्यातील मागासवर्गीय समाज अनेक कालखंड प्रक्रियेपासून उपेक्षित राहत चालला आहे. स्थानिक राजकारण आणि गावगुंड लोकांच्या हस्तक्षेपामुळे मागासवर्गीय समाजाच्या प्रगतीला अडसर निर्माण होत असल्याचे या प्रकरणातून समोर येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वेळु येथील सांगळेवस्ती या मागासवर्गीय चर्मकार समाजाची लोकवस्ती असलेल्या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाकडून दिनांक २६ मार्च रोजी ६३ चा ट्रान्सफॉर्मर व मेन लाईनचे ३९ पोल मंजूर झाले आहेत. मोरे नामक एजन्सीला याचे कामही मिळाले आहे.

परंतु, वेळु गावातील काही ग्रामस्थांच्या खोडसाळ व जातीयवादी भूमिकेमुळे नमूद डीपी ही सांगळेवस्ती या चर्मकार वस्तीला सोडून दुसरीकडे नेण्याचा घाट महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता डोळे व उपकार्यकारी अभियंता गांडूळे यांनी चालवला असल्याचा आरोप सांगळे वस्तीतील ग्रामस्थांनी केला आहे. अर्थार्जन करून हा ६३ चा एससाय दुसरीकडे बसवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. याबाबत पीडितांनी आंदोलनाचे नियोजन केले असून, महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालय अहमदनगर येथे दिनांक २४ ऑगस्ट २१ रोजी सकाळी ११ वाजेपासून सांगळे वस्ती येथील पीडित ग्रामस्थ मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राणांतिक उपोषण सुरू करणार आहेत.

याबाबत दिलीप धोंडीबा सांगळे (माजी सरपंच), धनंजय अशोक सांगळे, जगन्नाथ एकनाथ सांगळे, हनुमंत अशोक सांगळे, नाना राजू सांगळे, विजय धोंडीबा सांगळे, गणेश एकनाथ सांगळे, राजू धोंडीबा सांगळे यांनी स्थानिक समाज बांधवांसह उपोषण करणार असलेबाबत प्रसिद्धीपत्र माध्यमांना दिले आहे.

अधीक्षक अभियंता महावितरण, अहमदनगर यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये चर्मकार बांधवांनी नमूद केले आहे की, तालुक्यातील वेळु वाडी सांगळेवस्ती येथे डी पी टी सी अंतर्गत मागासवर्गीयांच्या स्ट्रीट लाइट्ससाठी ६३ चा एस.आय. जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक २६ मार्चला मंजूर केला आहे. महावितरण कंपनीकडून डीपीचे काम करण्यासाठी एजन्सीही नेमण्यात आली आहे. परंतु, गावातील काही लोकांनी सांगळे यांच्या चर्मकार वस्तीतील ट्रांसफार्मर महावितरणाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून, दुसरीकडे नेण्याचा घाट बांधला आहे.

सदर डीपी ही सांगळे वस्तीतच व्हावी. महावितरणचे अधिकारी व वेळु गावातील काही लोकांनी हा ट्रांसफार्मर दुसरीकडे बसवण्याचे नियोजन केले असून, अशा प्रकारे मागासवर्गीयांच्या विकासकामांवर डोळा ठेवणाऱ्या जातीवादी लोकांसह महावितरण कंपनीचे डोळे व गांडूळे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. The eye of Velu villagers on the DP of backward classes.! Ghat to be set up in DP village with the help of administration .. Demand to file a case of atrocity against some villagers including officials .. Deadly fast on 24th August ..

सांगळे वस्ती येथे मंजूर असलेला ६३ चा एससाय जर नियोजीत ठिकाणी बसवला नाही. तर, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्या अहमदनगर येथील कार्यालया समोर मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून प्राणांतिक उपोषणासाठी बसणार असल्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

स्त्रोत:(निवेदन)

https://bit.ly/bspmycityshrigonda

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading