अवैद्य व्यवसायांकडे पोलीस निरीक्षक ढिकले यांचे लक्ष की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष ? नागरिकांतून साहेबांच्या बदलीचा सूर…! एक पोलीस दारूचे, एक हॉटेलचे तर, एक वाळू, जुगार व मटक्याचे हप्ते गोळा करतो.!!.?

दिनांक २ ऑगस्ट, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात अनधिकृत व्यवसाय हे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या कालखंडापासून जोम धरत असल्याचे सामाजिक माध्यमांवर ज्येष्ठ पत्रकार मीराताई शिंदे व काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या गैर धंद्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केल्यानंतर जण माध्यमांतून गावोगावी चालू असलेल्या अवैद्य धंद्याविषयी चर्चा होत ते गोरख धंदे उजेडात येऊ लागले आहेत. त्याच बरोबर या धंद्यावर लक्ष अरणारे किंवा नैसर्गिक दुर्लक्ष करणारे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढिकले यांच्यावर मात्र, अनेकांनी लक्ष साधले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सामान्य मध्यमवर्गीय माणुस असल्या प्रक्रियेपासून कोसो दूर आहे. परंतु, स्वतःच्या घरातील काही अल्पवयीन मुलं जेंव्हा या अवैध धंद्यांच्या फंद्यात सापडून व्यसनाधीन होऊन बरबाद होतात. तेंव्हा चाललेले वास्तव यातून उजेडात येते. गुटका, खर्रा, मावा, गांजा, सिगारेट, शेकडो टपऱ्यांच्या माध्यमांतून विक्री होत, हजारो सामान्य मुलांचे शारीरिक नुकसान करतं आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून, टपरीवाल्यांकडूनही पोलीस हप्ता घेत असले बाबत समजते आहे.

पत्रकार मीराताई शिंदे यांनी उपस्थित केलेल्या विषयातून नशेले पदार्थ ज्यात गांजा, मेडिकल मधील औषधी गोळ्या, इंजेक्शन्स व रोजच्या वापरात येणारे काही पदार्थांचे अतिसेवन यातून व्यसन करणारी अल्पवयीन व तरुणांचा जथा समोर येत आहे. या नव्याने उगम झालेल्या वास्तविक परिस्थितीशी मीराताई शिंदे यांनी तालुका वासियांना परिचित केले आहे. अनधिकृत पद्धतीने चाललेल्या या प्रकारा विरोधातही पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसते. परिणामी हा प्रकार तालुक्यात जोम धरतांना दिसतो आहे.

याच बरोबर अवैध वाळू तस्करी, दारू विक्री, केमिकल युक्त ताडी विक्री, गांजा विक्री, देहविक्री, गोमांस विक्री, मटका, जुगार, बिंगो, गोवा, गुटका, खर्रा, भेसळयुक्त दूध, भेसळ युक्त जारचे पाणी, भेसळयुक्त हॉटेल मधील खाद्य पदार्थ अशा वेगवेगळ्या गैर उद्योगांतून सामान्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार तालुक्यात चालू आहे. यातून स्वहित साधत यंत्रणा लाखोंची उलाढाल करत आहे. श्रीगोंदा पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवून दुर्लक्ष करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याप्रक्रियेतुन मोठे अर्थार्जनही होत असल्याचे अनेकांचा आरोप आहे. तालुक्याला वाईट मार्गाला लावून हप्ते खोरीच्या माध्यमांतून स्व:स्वार्थ साधण्याचा हा खटाटोप तालुक्यातील जनतेपुढे मोठे संकट असल्याचे बोलले जात आहे.

तसेच, पोलीस यंत्रणेमार्फत कोरोना कालखंडामध्ये काहींना सवलत तर, काहींना दंड करत पोलीस ठाण्यासमोरील पार्किंग, शहरातील ट्राफिक व साथ प्रतिबंधक कायद्याच्या नावाखाली मोठी उलाढाल चालू आहे. यात जाणीवपूर्वक पावत्या केल्याचे तर, काहीही चूक नसतांना दंड केल्याचे अनेकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या नियमांखाली किराणा दुकान, भाजीपाला दुकानदार, फळ विक्रेते तसेच जीवनावश्यक वस्तूंचे सर्व दुकान वेळेत बंद केले जातात. पाच-दहा मिनिटे इकडे तिकडे झाल्यास तेथेही शेकडो रुपयांचे दंड केल्याच्या घटना आहेत. मात्र, रात्रभर चाललेल्या हॉटेल्स, दारू विक्री, जुगार, मटका यांना थेट सूट देणाऱ्या पोलीस यंत्रने बाबत आणखी काय बोलावे.?

अनेकदा बाहेर ठिकाणावरून तालुका कार्यक्षेत्रात कर्तव्यावर आलेले अधिकारी त्यांची सरकारी यंत्रणा कार्यरत करून, तालुक्यातील काही गैर मार्गाच्या लोकांना ताकत देत, अनधिकृत व असंविधानिक व्यवसाय वाढीस कारण ठरत, सामान्यांच्या जीवाचा खेळखंडोबा तर करत नाहीत ना ? असा प्रश्न श्रीगोंदा वासियांना यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तालुक्यातील काही ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक संघटनांच्या माध्यमांतून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात चालू असलेल्या या सगळ्या गोरख व असंविधानिक धंद्या विरोधात सामाजिक एल्गार करीत, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या बदलीबाबत चर्चा जोर धरू लागली आहे. लवकरच काही पत्रकार व सामाजिक संघटना एकत्र येत, तालुक्यातील तरुण पिढीला वाचवण्यासाठी, सामान्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी, अधिकार्‍यांची व यंत्रनेच्या हप्ते खोरी व लुटी विरोधात आवाज उठवत, श्रीगोंदा तालुका अवैध धंदे मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक यांना भेटणार असल्याचे समजते आहे.

स्त्रोत:(सामाजिक माध्यमांतील चर्चा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading