साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न..

दिनांक २ ऑगस्ट, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराच्या वैभवात भर घालणारे एक सुसज्ज स्मारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिनांक १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर सुधीर तांबे व श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कानडे यांच्यासह तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीगोंदा नगरपालिकेने लोकार्पण केले.

या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरचे लोकप्रिय आमदार लहू कानडे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. तर, डॉक्टर सुधीर तांबे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी आपल्या प्रमुख भाषणात बोलतांना लहू कानडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राचा उलगडा केला. त्यांनी अण्णाभाऊंच्या जीवनातील संघर्षाची उदाहरणे देत, देशातील समाज व्यवस्थेचं चित्रण या ठिकाणी नमूद केले. अण्णाभाऊंच्या दीड दिवसाच्या शाळेचे वर्णन यावेळी आमदार कानडे यांनी केले.

त्यानी पुढे सांगितले की, पोटासाठी अण्णाभाऊंनी वयाच्या अकराव्या वर्षी वाटेगाव ते भायखळा हा बिकट प्रवास केला. अण्णाभाऊंच्या या प्रवासाचे वर्णन आमदार कानडे यांनी महायात्रा म्हणून केले. जी शेतापासून लाल चौकात नेलेल्या माऊच्या मार्च आणि आप्पे गावापासून आळंदी पर्यंत पोहोचलेल्या ज्ञानदेवाच्या महायात्रे पेक्षाही कमी नसल्याचे कानडेंनी नमूद केले.

अण्णाभाऊ हा असा जागतिक दर्जाचा साहित्यिक आहे. की, ज्याला वाटेगाव ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी तब्बल साडेतीन महिने इतका कालखंड लागला. साठे कुटुंबाला ठाण्यामध्ये दगड खाणीत दगड फोडावे लागले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अण्णाभाऊ साठे यांचे योगदान आमदार कानडे यांनी विशद केले. नगर जिल्ह्यावर अण्णाभाऊंचा जास्त जिव्हाळा असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाला लाभलेल्या स्वतंत्र पहाटेचे अण्णाभाऊ कवी असल्याचे मत आमदार लहू कानडे यांनी नमूद केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव अण्णाभाऊंवर होता. कारण, भायखळामध्ये सामाजिक चळवळीचे कार्य करत असतांना सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते अण्णाभाऊंचे संबंधित होते. पुढे ते म्हणाले की, इथल्या प्रस्थापित यंत्रणेने मानवी मूल्य संपवण्याचे षड्यंत्र केले. यानंतर घटनेतील तत्त्वज्ञान अबाधित ठेवण्यासाठी सामान्यांनी सक्रीय झाले पाहिजे. अण्णाभाऊंचे प्रत्येक साहित्य आपल्याला सत्याप्रति तेवत ठेवते. असे प्रतिपादन यावेळी आमदार लहू कानडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या भाषणात केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर सुधीर तांबे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर त्यांनी भाषण केले. त्याचबरोबर तत्कालीन समाजव्यवस्थेत उभारलेल्या जातिव्यवस्थेने दबलेल्या समाजघटकांना दडपत स्वतःचे हित साधण्याचे काम केले. सामान्यांना संधी उपलब्ध होऊ दिली नाही. साम्यवादी विचारांच्या अण्णाभाऊ साठेंनी आंबेडकरी विचार स्वीकारला होता. “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव” या त्यांच्या वाक्यातून आंबेडकरांच्या विचारांना त्यांनी आत्मसात केल्याचे दिसते.

अण्णाभाऊंनी आयुष्यभर संघर्ष केल्याचे डॉक्टर तांबे यांनी अध्यक्षीय भाषण करताना नमूद केले. भारतीय संविधानाबाबत बोलताना डॉ. तांबे सांगतात की, आपली शक्तिस्थान खंडीत करण्याचे काम देशात काही यंत्रणा करत आहेत. त्यासाठी आपण जागं झालं पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या संविधानाच्या तत्वज्ञानानुसार देशातील सामान्यांचे जनजीवन बऱ्याच प्रमाणात सुधारत आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

अनेक जनकल्याणाच्या बाबी लागू करण्यात आल्या असून, सामान्यांना त्याचा फायदा होत आहे. मात्र, बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण हे दूध प्राषण करूनही आपली तरुण पिढी जर शांत असेल. तर, सिंहावलोकन करण्याची गरज असल्याचे मत तांबे यांनी यावेळी नमूद केले. Public Dedication Ceremony of Sahityaratna Annabhau Sathe Memorial ..

या कार्यक्रमासाठी श्रीगोंदा नगरपालिकेच्या (नगराध्यक्षा) सौ.शुभांगी ताई पोटे, सौ.सीमाताई गोरे, सौ.सोनाली ताई हृदय घोडके, बाबासाहेब भोस, घनश्याम आण्णा शेलार, राजेंद्र दादा नागवडे, हरिदास आबा शिर्के, (गटनेते) मनोहर दादा पोटे, गणेश भोस, हृदय घोडके, समीर बोरा, (आरपीआयचे जिल्हाध्यक्ष) सुनील साळवे, (नगरसेवक) राजाभाऊ लोखंडे, निसार भाई बेपारी, नंदू भाऊ ससाने, अनिल भैय्या ससाने, कुणाल भैया शिरवाळे, प्रशांत गोरे, मिराताई शिंदे, सतीश मखरे, अशोक आळेकर, (मुख्याधिकारी) मंगेश देवरे, Ad. सुनील भोस, राजू दादा गोरे, स्मितल भैया वाबळे, राजापुरे सर, खेडकर सर, भगवान आबा गोरखे, अशोक ससाणे, (आरपीआय तालुकाध्यक्ष) राजाभाऊ जगताप, (शहराध्यक्ष) विशाल घोडके, पप्पू घोडके, जॉन घोडके, (ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी) अक्षय आठवले, अक्षय ससाने, शुभम घोडके, (राष्ट्रवादी सेल तालुकाध्यक्ष) संदीप भाऊ उमाप, गोरख तात्या घोडके, भारत घोडके, लक्ष्मण घोडके, शिवाजी आप्पा घोडके, किशोर नेटके, मनोज घाडगे, सचिन गायकवाड, श्रीकांत दादा घोडके, भाऊ घोडके, सचिन घोडके, राजू घोडके, प्रवीण सूडगे, पुस्पक घोडके, ज्ञानदेव शिरवाळे, पै.आकाश ससाने, अक्षय घोडके, मुकुंद सोनटक्के, नवनाथ शिंदे, संतोष शिंदे, ससाने सर सह सिद्धार्थ नगर, ससाणे नगर, शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते.

या लोकार्पण सोहळ्याचे प्रस्ताविक मनोहर दादा पोटे यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रशांत गोरे यांनी केले. यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

स्त्रोत:(लोकार्पण सोहळा व मान्यवरांची भाषनं)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading