गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा अपघात: मदतीची साद..

दिनांक ३ जानेवारी २०२५,आढळगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर):

महेश संजय घोडके (वय २५) या गॅरेज कामगार तरुणाचा १ जानेवारी २०२५ रोजी लिंपणगाव गेटजवळ दुर्दैवी अपघात झाला. अपघातामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या तो मॅक केअर हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचार घेत आहे.

महेशची आर्थिक परिस्थिती अत्यंत जेमतेम असून उपचारांसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. डॉक्टरांच्या मते, ऑपरेशनसह औषधोपचारासाठी मोठी रक्कम आवश्यक आहे. महेशचे कुटुंब या आर्थिक भाराखाली दबलेले आहे आणि त्यांनी सर्वसामान्य जनतेकडे मदतीची याचना केली आहे.

महेश गॅरेजमध्ये काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या कठीण प्रसंगात मदतीचा हात पुढे करण्यासाठी त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी प्रयत्नशील आहेत.

जर आपण या संकटात महेशला मदत करू इच्छित असाल, तर खालील क्यूआर कोड किंवा अकाउंट डिटेल्सवर रक्कम पाठवून आपण आपले योगदान देऊ शकता. महेशच्या स्वतःच्या खात्यावर जमा होणारी ही मदत त्याच्या उपचारांसाठी वापरण्यात येईल.

आपण आपल्या सढळ हाताने मदत करावी, ही नम्र विनंती. एकत्रित प्रयत्नांनी महेशला पुन्हा जीवनाची नवी सुरुवात मिळवून देऊया.

मदतीसाठी येथे स्कॅन करा..

स्रोत:(पै. अतुल कोकणे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading