दरोडा, घरफोडीतील ३ वर्षापासुन फरार आरोपी, श्रीगोंदा पोलीसांकडुन अटक..

दिनांक २३ सप्टेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत कोठा, काष्टी, श्रीगोंदा परिसरातील दाखल घरफोडी व चोरीचे गुन्ह्यांचा तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक रामराव ठिकले यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हे हे दौंड तालुक्यातील खडकी येथील गुन्हेगार यांनी केलेले आहेत.

यावरुन सदर भागात श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी दौंड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन दिनांक २२ सप्टेंबर रोजी पहाटे नमूद कार्यक्षेत्रात कॉबिग राबविले असता, आकर्षन उर्फ अक्षय नवनाथ पवार (रा.भगतवाडी ता.करमाळा जि.सोलापुर) (ह.रा.खडकी ता.दौंड जि.पुणे), सुरेश दऱ्या भोसले (रा.राहीजवाडी काष्टी ता.श्रीगोंदा), संतुर नवनाथ पवार दोघे (रा.भगतवाडी ता.करमाळा जि.सोलापुर) (ह.रा.खडकी ता.दौंड जि.पुणे) हे तिन संशयित ईसम मिळुन आले.

त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता, ते दरोडा, घरफोडी गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार असुन, आकर्षन उर्फ अक्षय नवनाथ पवार वय २२ वर्षे याचेवर पूर्वी दाखल असलेले श्रीगोंदा पो स्टे हद्दीतील भा.द.वि.क ३९९, ४०२ (फरार), ३७९ (फरार)…गुन्हे दाखल आहेत.

करमाळा पोलीस स्टेशन भा.द.वि.क.३९९, ४०२, ३७९, ३४, ३७९, ३४, सुरेश दऱ्या भोसले वय ३५ वर्षे याचे विरुध्द भा.द.वि.क. ३९९, ४०२, ३०७, ३३४, ३९९, ३२४, ३३५ संतुर नवनाथ पवार वय २० वर्षे हा २०१८ पासुन दरोड्याची तयारी व घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये फरार होता.

आरोपीतांकडे कसुन चौकशी केली असता, त्यांनी कौठा येथे दि ७ सप्टेंबर २१ रोजी विठ्ठल झुंबर चव्हाण यांचे घरी घरफोडी झालेबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. झालेल्या घरफोडीत सुरेश भोसले व संतुर पवार यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

तसेच दि २२ सप्टेंबर २१ रोजी सुरेश राजाराम गावडे रा.गावडे मळा काष्टी ता.श्रीगोंदा यांचे शेतात चोरी झालेबाबत फिर्याद दिली होती. त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. लिंबु चोरीचा गुन्हा सुरेश भोसले व साथीदारांनी केल्याचे कबुल केले असुन, आरोपीतांकडुन चोरी केलेले १००००/ – रु. किंमतीचे लिंबु हस्तगत केले आहेत. तसेच आरोपी संतुर पवार याचे ताब्यात मिळुन आलेली एच एफ डिलेक्स मोटार सायकलची चौकशी केली असता, सदर मोटार सायकल ही दौंड येथुन चोरी गेल्याचे दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तिन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असुन, त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफो नंदकुमार भैलुमे हे करीत आहेत .

सदरची कारवाई (पोलीस अधिक्षक) श्री मनोज पाटील साहेब, (अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल साहेब, (उपविभागीय पोलीस अधिकारी) श्री अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) श्री रामराव ढिकले, (सपोनि) दिलीप तेजनकर, (सहा.पो.उप.निरी.) अंकुश ढवळे, (सफो) नंदकुमार भैलुमे, (पोन गोकुळ इंगवले, (पोकॉ) प्रकाश मांडगे, (पोकॉ) किरण बोराडे, (पोका) दादा टाके, (पोकॉ) अमोल कोतकर, (पोकॉ) फारुख मण्यार यांनी केली आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading