दिनांक २४ सप्टेंबर, श्रीगोंदा:
काष्टी येथील ज्ञानेश्वर (नाना) राऊत यांचे मागील वर्षी कोरोना संक्रमण काळात प्रादुर्भाव होऊन निधन झाले. तालुक्याच्या सामाजिक व राजकीय जडणघडनीत मोलाचे योगदान त्यांनी दिले आहे.

सामान्यांसाठी झगडणारा कार्यकर्ता अशी नानांची ओळख होती. उपेक्षित व वंचित घटकांसाठी सदैव सक्रिय राहून, कामं करणाऱ्या नानांच्या जीवन प्रवासाचा यावेळी अनेकांनी उल्लेख केला. “आठवणीतील नाना” या कालकथीत ज्ञानेश्वर (नाना) राऊत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना उपस्थितांनी वर्णन केले व त्यांना आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, पत्रकारिता, व्यवसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी या कार्यक्रमात व्याख्यान दिले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते हे होते. काष्टी येथील जयश्री लॉन्स मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्मृती दिनाच्या कार्यक्रमानिमित्त नानांच्या तत्कालीन कार्यप्रणालीचा ऊहापोह करत त्यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. On the first remembrance day of Smritishesh Dnyaneshwar (Nana) Raut, Nana’s memories are revived .. Nana’s valuable contribution in the social and political development of Shrigonda ..

यावेळी (आमदार) बबनराव पाचपुते, अनुराधा ताई नागवडे (जि.प.सदस्या), बाळासाहेब नाहाटा (संचालक राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघ), केशवभाऊ मगर, जिजाबापू शिंदे, दिपक शेठ नागवडे (जेष्ठ नेते), (माजी आमदार) राहुल जगताप, बाबासाहेब भोस (माजी अध्यक्ष जि प अहमदनगर), ad. कमल सावंत (क्रिकेट काँशिल सदस्या), प्रकाश कुतवळ (उद्योजक), बंडू तात्या जगताप (सामाजिक कार्यकर्ते), साजन पाचपुते, टिळक भोस (संभाजी ब्रिगेड), संतोष जठार (वंचित बहुजन आघाडी), स्मितल भैया वाबळे (काँग्रेस), ऋषिकेश गायकवाड (उद्योजक), मेजर पवार, रफिक इनामदार (सामाजिक कार्यकर्ते), चंदन मुनोत (उद्योजक) यांसह सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नानांच्या स्मृतींना उजाळा देत विनम्र अभिवादन व्यक्त केले. नमूद कार्यक्रमात उपस्थितांचे आभार नानांचे चिरंजीव अवधूत राऊत यांनी मानले.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
