दिनांक ३ जुलै (घोगरगाव,श्रीगोंदा):
सुनिल माणीक तरटे (वय ४६ वर्ष) या इसमास रस्त्यात अडवून रोहीत रमेश तरटे आणि शुभम रमेश तरटे यांनी छातीवर तसेच गुप्त भागावर लाथा मारल्याने त्यांचा नगर, सोलापुर रोडवर साई बँग हाउस समोर मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक दोन जुलै रोजी घडली. याविषयी मयत सुनिल तरटे यांच्या मुलाने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादीत नमूद करण्यात आले की, ११ वाजण्याच्या सुमारास सुनिल नगर सोलापुर रोडचे कडेला उभा होते . तेंव्हा रोहीत रमेश तरटे आणि शुभम रमेश तरटे हे दोन मोटार सायकल चालवत सुनिल जवळ आले, गाडी थांबविली व सुनीलला गाडी दिसत नाही का ? म्हणत अर्वाच्च व अश्लील शिवीगाळ केली, यावेळी रोहीतने सुनीलला गुप्त अंगावर लाथ मारल्याने सुनील रोडवर खाली डोक्यावर पडला, परत उठुन उभा राहील्यावर शुभमने सुनिलच्या छातीवर लाथ मारली. सुनिल पुन्हा रोडवर खाली पडला. त्याचे डोक्याला मागचे बाजुला जबरी मार लागल्याने सुनीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मारहाण झाल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी रोजच्या नियोजित कामासाठी निघून गेले. मात्र, मागे सुनिल तरटे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना नंतर समजले असल्याची माहिती मिळते आहे.
मयत सुनिल तरटे यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून रोहित रमेश तरटे आणि शुभम रमेश तरटे या दोघांवर भादंवि कलम ३०२, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुनिल तरटे मयत झाल्याची माहिती समजल्या नंतर दोन्ही आरोपी कर्जत पोलिस स्टेशनला स्वतःहून हजर झाले, अर्थात सरेंडर झाल्याचे समजते आहे. आरोपी कारेगाव औद्योगिक क्षेत्रांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तींच्या संपर्कात आहेत, साधारण लोकांना त्रास देणे, पैशासाठी हाणामारी करणे असा काहीसा उद्योग करणाऱ्यांच्या छत्रछायेत असल्याने दादागिरीच्या आविर्भावामध्ये त्यांनी सुनिल बरोबर हातापायी करून मारहाण केल्याने अशी दुर्घटना घडल्याचे परिसरात बोलले जात आहे.
(स्त्रोत:श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयताच्या मुलाने दाखल केलेली फिर्याद व मिळालेल्या माहितीनुसार)
