दिनांक २५ ऑगस्ट(सुरेगाव/विसापूर फाटा,श्रीगोंदा):
दिनांक २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:०० वाजनेच्या सुमारास विसापूर फाटा, ता. श्रीगोंदा येथे अक्षय काळे, मिथून काळे व इतर चार ते पाच अनोळखी इसम, सर्व रा.घुटेवाडी शिवार, ता.श्रीगोंदा यांनी जुने वादाचे कारणावरुन नातीक चव्हाण, श्रीधर चव्हाण, नागेश चव्हाण सर्व रा. लहाकर मळा, सुरेगांव ता. श्रीगोंदा व लिंब्या काळे रा. देऊळगांव, ता.नगर यांची तिक्ष्ण व धारदार हत्याराने छातीवर, पोटावर वार करुन त्यांची हत्या केल्याबाबत फिर्यादी सौ. आक्षदा कुंजीलाल चव्हाण हिने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमूद गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून, अखिलेश कुमार सिंह (पोलीस अधीक्षक, अहमदनगर), सागर पाटील (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर), संजय सातव ( उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग) तसेच दिलीप पवार (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर), पोनि.अरविंद माने (बेलवंडी पो.स्टे.) पोनि. दौलत जाधव (श्रीगोंदा पो.स्टे) यांनी सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहीती घेतली.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक सिंग यांनी श्रीगोंदा येथे कॅम्प करुन स्वतः तपासाची सुत्रे हाती घेत गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेणे कामी स्थानिक प्रशासनाची वेगवेगळी पथके तयार करून सुचना दिल्या. तपासा दरम्याण पोलीस अधिक्षक सिंग यांनी घटनास्थळी बारकाईने निरीक्षण केले. तसेच, आजूबाजूस केलेल्या चौकशीमध्ये फिर्यादी यांनी दिलेली माहीती व प्रत्यक्षात घडलेली घटना यामध्ये विसंगती दिसून आल्याने, वरिष्ठांनी घटनेबाबत सखोल माहीती घेण्याच्या सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोना सुनिल चव्हाण व कर्जत येथील पोहेकॉ. अंकूश ढवळे व इतर कर्मचारी यांनी वेषांतर करुन घटना ठिकाणचे आजूबाजूचे परिसरामध्ये फिरुन तसेच मयत यांचे नातेवाईकांना विश्वासात घेवून गोपनिय माहीती घेतली. जलद गतीने गोपनिय व तांत्रीक तपास करण्यात आला. यात सदरचे हत्याकांड हे यातील मयत व त्यांचे साथीदारांनी स्वस्तात सोने देतो म्हणून, बोलावून घेतलेल्या ग्राहकांनी केला असल्याची माहीती तपासामध्ये पुढे आली.
त्या अनुषंगाने अधिक माहीती घेतली असता, साधारण एक महीण्यापुर्वी मयत व त्यांचे साथीदारांनी जळगांव येथील एक महीला व दोन इसमांना फोन करुन त्यांना स्वस्तात सोने विक्रीचे अमिष दाखवून विसापूर फाटा येथे बोलावून घेवून, खात्री करण्यासाठी त्यांना काही प्रमाणात खरे सोने देवून ४,००,००० रुपयास २५० ग्रॅम सोने विक्रीचा व्यवहार ठरविला होता.
ठरल्याप्रमाणे दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वा.चे सुमारास जळगाव येथील महीला व तीचे साथीदार हे विसापूर फाटा येथे सोने खरेदीसाठी आले. नंतर नमुद मयत इसम व त्यांचे साथीदारांनी जळगांव येथून आलेली महीला व तिचे साथीदारांना मारहाण करुन त्यांचे जवळील रोख रक्कम व दागिणे बळजबरीने काढून घेतले. त्यावेळी सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी सदरचे हत्याकांड केल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. पोलीस अधिक्षक, जळगाव व स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी, जळगांव यांचेशी समन्वय ठेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी जळगाव येथे जावून नरेश जगदिश सोनवणे, सपकाळे व सोनवणे नामक महिला, प्रेमराज रमेश पाटील व योगेश मोहन ठाकूर सर्व रा.हरी विठ्ठल नगर, जळगांव यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी सांगीतले कि, दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वा. चे सुमारास स्वस्तात सोने खरेदीसाठी जळगाव येथून विसापूर फाटा येथे आलो होतो. तेथे आल्यानंतर सपकाळे नामक महिलेने संबंधीत इसमांना संपर्क केला असता, त्यांनी विसापूर जाणारे रोडने त्यांना रस्त्याचे कडेला असलेल्या शेतामध्ये बोलावून घेतले. सपकाळे व त्यांचे सोबतचे इसम हे आरोपींनी बोलाविले ठिकाणी जावून थांबल्यानंतर नमुद मयत व त्यांचे नातेवाईक व फिर्यादी यांनी सपकाळे यांचेकडून २,९५,००० रुपये मोजून घेतल्यानंतर मयत यांनी ” देवून टाका , देवून टाका ” असा मोठ्याने आवाज करताच शेताचे आजूबाजूस दबा धरुन बसलेले इतर साथीदार यांनी त्या ठिकाणी येवून सपकाळे या महिलेसह सोबतच्या लोकांवर हल्ला करुन त्यांचेजवळील मोबाईल, पर्स व गळ्यातील दागिणे बळजबरीने काढून घेतले. त्या दरम्याण झालेल्या झटापटीमध्ये जळगाव येथून आलेल्या ग्राहकाने त्याचेकडील तिक्ष्ण हत्याराने वार करुन, यातील चार इसमांची यांची हत्या केली असल्याचे स्पष्ट केले.
या हत्याकांडातील आरोपी नरेश जगदिश सोनवणे (वय- २२ वर्षे), रा. हरी विठ्ठल नगर , जळगांव यांस दि. २४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेली असून, त्यांस दिनांक २७ ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच सपकाळे, वय- ४२ वर्षे, सोनवणे (वय -४३ वर्षे), प्रेमराज रमेश पाटील (वय -२२ वर्षे, सर्व रा. सिध्दार्थ सोसायटी, तडवी गल्ली, हरी विठ्ठल नगर, जळगांव) यांना आज दिनांक २५ ऑगस्ट २०२० रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सिंग यांनी माध्यमांना दिली आहे.
तसेच घटनेतील मयत व त्यांचे २५ ते ३० साथीदारांनी फिर्यादी सपकाळे (महिला), वय -४० वर्षे, धंदा- घरकाम, रा. सिध्दार्थ सोसायटी, हरी विठ्ठल नगर, जळगाव व त्यांचे साथीदार यांना स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून विसापूर फाटा येथे बोलावून घेत मारहाण करुन, त्यांचे जवळील रोख रक्कम, सोन्याचे दागिणे असा एकूण ३,१५,००० रुपये किं.चा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बेलवंडी पो.स्टे.त भादवि कलम ३९५ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कौतुकास्पद कामगीरी अखिलेश कुमार सिंह (पोलीस अधीक्षक, अहमदनगर) यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. सागर पाटील (अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर) व संजय सातव (उप विभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार, बेलवंडी पो.स्टे.चे पोनि.अरविंद माने, श्रीगोंदा पो.स्टे.चे पोनि.दौलत जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई गणेश इंगळे, श्रीगोंदा पो.स्टे.चे सपोनि राजेन्द्र सानप, बेलवंडी पो.स्टे.चे पोसई बोराडे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, अंकूश ढवळे, विजयकुमार वेठेकर, बाळासाहेब मूळीक, पोना संदीप पवार, संतोष लोढे, विशाल दळवी, रवि सोनटक्के, विश्वास बेरड, पोकॉ संदीप दरंदले, विजय धनेधर, मच्छिन्द्र बर्ड, कमलेश पाथरुट, शिवाजी ढाकणे, रविन्द्र धुंगासे, रोहीत मिसाळ, मपोना सिरसेना काळे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर, बाळासाहेब भोपळे, देविदास काळे, भगवान धुळे तसेच जळगांव स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि बापू रोहम तसेच पोहेकॉ संजय सपकाळे, सुधाकर आंभोरे, अश्रफ शेख, शरद भालेराव, विजयसिंग पाटील, जितेन्द्र पाटील, मपोना अलका शिंदे यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
स्वस्तात सोने विक्री बाबत कोणत्याही व्यक्तिस फोन आल्यास तात्काळ त्या क्रमांकाची माहीती पोलीसांना द्यावी. तसेच, सोने खरेदीस बळी पडू नये. असे आवाहन पोलीस अधीक्षक सिंग यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
स्रोत:(पोलीस अधीक्षक,अहमदनगर)
